घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजीएसटीविरोधात धान्य व्यापाऱ्यांचा बंद : नाशिक जिल्ह्यात शंभर कोटींची उलाढाल ठप्प

जीएसटीविरोधात धान्य व्यापाऱ्यांचा बंद : नाशिक जिल्ह्यात शंभर कोटींची उलाढाल ठप्प

Subscribe

नाशिक : अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात शनिवारी व्यापारी संघटनांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला. १८ जुलैपासून पॅकिंग केेलेल्या अनब्रँन्डेड अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी लागू होणार आहे. याचा निषेध म्हणून नाशिकमध्येही व्यापारी संघटनांनी बंद पुकारल्याने शहरातील बाजारपेठांवर परिणाम दिसून आला. नाशिकमध्ये व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला.

जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. 8 ते 10 टक्के दरवाढीचा बोजा ग्राहकांवरच पडणार आहे. यामुळे आता पॅकिंगमध्ये व लेबल लावलेल्या जीवनावश्यक वस्तुंवर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. आज प्रत्येक माल हा किलो, दोन किलोच्या पँकिंगमध्येच व्यापारी मोजून ठेवतो व यादीनुसार माल देतो, सुट्या स्वरूपात देणे शक्य नसते,यामुळे सुट्या पण केवळ वेस्टनात बंद केलेल्या वस्तुंवरही जीएसटी लागणार असल्याची मोठी अडचण व्यापार्‍यांना सतावत आहे.केवळ बडया व्यावसायिकांसाठी हे कारस्थान असून छोटया व्यापार्‍यांचे व्यसाय मोडीत काढण्याचा हा प्रकार असल्याचे व्यापारयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णया विरोधात महाराष्ट्र चेंबरने १६ जुलै रोजी एकदिवस बंद पुकारला. नाशिकमध्ये व्यापार्‍यांनी कडकडीट बंद पाळत या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. यावेळी शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरात व्यापार्‍यांनी एकत्रित येत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. व्यापारी एकजूटीचा विजय असो, नॉन ब्रँन्डेड वस्तूंवरील जीएसटी रदद करा, महागाईच्या विळख्यातून नागरिकांची सुटका करा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या बंदमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांसह उपनगरांमधील धान्य, किराणा व्यापार्‍यांनीही दुकाने बंद ठेवली. तसेच मार्केटयार्ड परिसरातील किराणा, घाउक, भुसार अडत व्यापारीही या बंदमध्ये सहभागी झाले होते. याबंदमुळे जिल्हयातील १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली.

आज कोणत्याही किराणा दुकानात ग्राहकाने मागणी केल्यानंतर माल मोजून दिला जात नाही तर गर्दी व ग्राहकाचा वेळ लक्षात घेता आगाऊ पॅकिंग करून ठेवल्या जातात, आता अशा मालावरही जीएसटी मोजावा लागणार आहे. काही बडया व्यावसायिकांसाठी किरकोळ, घाऊक व्यापार्‍यांचा व्यवसाय अडचणीत आणला जात आहे. या जीएसटीतून व्यापारयांना मुक्त करावे व जनतेलाही महागाईतून मुक्त करावे. एकिकडे कोविड काळात मोफत धान्य वाटप करायचे अन दुसरीकडे धान्यावर जीएसटी लावायचा हा कोणता न्याय. : प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -