घरमहाराष्ट्रकुटुंबाचा विरोध, पठ्ठ्यानं माघार न घेता लढवली निवडणूक; शर्ट काढून साजरा केला...

कुटुंबाचा विरोध, पठ्ठ्यानं माघार न घेता लढवली निवडणूक; शर्ट काढून साजरा केला विजय

Subscribe

ग्रामपंचातीच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. या निवडणुकांमध्ये अनेक विजयी उमेदवारांनी जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रिया देताना त्यांनी कुटुंबाच्या पाठींब्याचा उल्लेख केला. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे विजयी झालो, अशी प्रतिक्रिया देणारे विजयी उमेदवार सर्वांनीच पाहीले आहेत. मात्र, कुटुंबाचा विरोध असताना देखील निवडणूक लढवत ती जिंकली, अशी एक बातमी समोर आली आहे.

ठाण्यातील शहापूरमधील अल्याणी ग्रामपंचायत निवडणुकीत कुटुंबाचा विरोध असताना देखील विनायक सापळे निवडणूक लढले. विनायक सापळे हे शिवसेनेच्या पॅनेलकडून निवडणूक लढले. अल्याणी गावातील वार्ड क्रमांक ३ मध्ये विनायक सापळे हे विजयी झाले आहेत. विजयी झाल्यानंतर अंगावरचा शर्ट काढत विनायक सापळे यांनी विजयाचा जल्लोष केला.

- Advertisement -

कुटुंबाचा विरोध

विनायक सापळे यांनी कुटुंबातीलच काही लोकांनी विरोध केला होता. सापळेंचा दारुण पराभव करण्यासाठीही कुटुंबातील सदस्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. कुटुंबातील काही सदस्य जरी सोबत नसले तरी शेजारी आणि गावातील अनेकांनी विनायक सापळे यांची ठामपणे साथ दिले. त्यामुळेच ते अल्याणी गावातील प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आले. विरोध करणाऱ्या कुटुंबाला विरोध करणाऱ्यांना विजयी झाल्याचं दाखवून देण्यासाठी विनायक सापळे यांनी मतमोजणी सुरु असलेल्या तहसील कार्यालयातून बाहेर पडताच अंगावरचा शर्ट काढत दंड थोपटत विजय साजरा केला.


हेही वाचा – Maharashtra Gram Panchayat: ७३ वर्षांचा अपराजित योद्धा; १० वेळा लढले अन् १० वेळा जिंकले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -