घरमहाराष्ट्रGram Panchayat Election Results 2021: पतीला खांद्यावर घेत पत्नीने काढली मिरवणूक

Gram Panchayat Election Results 2021: पतीला खांद्यावर घेत पत्नीने काढली मिरवणूक

Subscribe

सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा

राज्यात सोमवारी सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूकींचे निकाल जाहीर झाले आहे. या ग्रामपंचायतीत अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर विजयी उमेदवारांची मोठ्या जोशात निवडणुक काढण्यात आली आहे. ग्रामपंचायतींवर कोणाला किती वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश आलंय हे कालच्या निकालात स्पष्ट झाले आहे. गावखेड्यांत अनेक विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढल्या जात आहेत. यातच एका विजयी उमेदवार पतीची चक्क पत्नीने खांद्यावर घेत मिरवणुक काढली आहे. या मिरवणूकीने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये पुणे जिल्ह्यातील पाळू ग्रामपंचायतीत जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने ७ पैकी ६ जागांवर विजय मिळवला आहे. तर जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने मिळवलेल्या यशामागे महिलांचा मोलाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. याच गावातील विजयी उमेदवार पतीला चक्क पत्नीने खांद्यावर घेत मिरवणूक काढली आहे. पत्नीने आपल्या पतीची आनोख्या पद्धतीने मिरवणूक काढत विजयोत्सव साजरा केला आहे.

- Advertisement -

एखादा उमेदवार विजयी झाला की कार्यकर्ते त्या उमेदवाराला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढताना तुम्ही पाहिले असाल परंतु पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेल्या संतोष शंकर गुरव यांचा विजयोत्सव त्यांच्या पत्नीने खांद्यावरुन मिरवणूक काढत साजरा केला आहे. संतोष शंकर गुरव यांनी २२१ मतांनी विरोध उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे.

राज्यात १४ हजार ग्रामपंचायतीची शुक्रवार १५ जानेवारी रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या ग्रामपंचायत निवडणूकींचा निकाल सोमवारी १८ जानेवारीला जाहीर करण्यात आला आहे. या निकालाच्यानुसार सर्वच राजकीय पक्ष जास्त जागांवर विजय मिळवल्याचा दावा करत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीनेही राज्यात ८० टक्के जागांवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -