धक्कादायक! आजोबांच्या चिता शांत होत नाही, तोपर्यंत काकाने केला पुतणीवर लैंगिक अत्याचार

Rape Case

दिवसेंदिवस महिला असुरक्षित असल्याचे चित्र माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमधून समोर येत आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथील प्रकरणातील घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला असताना बलात्काराच्या घटना समोरच येत आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात बारा वर्षांच्या मुलीवर नात्यातील चुलत काकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना गोंडपिंपरी तालुक्यातील येनबोथला गावातील ही घटना असून २६ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

असा घडला प्रकार

गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा संतापजनक प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिंपरी तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येनबोथला येथे पीडित मुलीच्या आजोबाचे निधन झाले होते. त्यामुळे दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी पाहुण्यांसह जेवण करायला बसले. पाहुण्यांना जेवण देत असताना ही मुलगी घरातून बाहेर पडली. यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी काका कमलाकर राऊत याने तिला घराजवळच असलेल्या रांजीत नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळातच मुलीचे वडील हे घराबाहेर निघाले असताना मुलीचा ओरडण्याचा आवाज आला.

जीवे मारण्याची दिली होती धमकी

आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असता घटनास्थळावरून आरोपी कमलाकर राऊत याने पळ काढला. मुलीला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. एवढंच नाही तर यापूर्वी देखील कमलाकर राऊत याने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. ‘ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारीन, अशी धमकी सुद्धा दिली होती. त्यामुळे भीतीपोटी मुलीने घरच्यांना याबद्दल काही सांगितले नाही.

आरोपीवर गुन्हा दाखल

मुलीवर झालेला अत्याचार पाहून पालकांनी लगेच रात्री गोंडपिपरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने येनबोथला गाव गाठले आणि गावालगत पाण्याच्या टाकीजवळ लपून असलेल्या कमलाकरला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. पीडित मुलीला उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.


‘मुलींवर संस्कार करणं आई-वडिलांचं कर्तव्य’; बलात्कार प्रकरणी भाजपा आमदाराचे वक्तव्य