अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून आजीचा खून

अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून नातवाने आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे.

grandson killed grandmother black magic doubt palghar

पालघर येथे क्रूर नातवाने अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काळ्या जादूच्या संशयाने नातवाने आपल्या ६२ वर्षीय आजीचा खून करुन फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपी नातवाचा शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

पालघरच्या विक्रमगड तालुक्यात कैलास हा आपल्या आजीसोबत राहत होता. मात्र, आजी काळी जादू करत असल्याचा संशय नातवाला आला. आपल्यावर जादूटोण्याचे प्रयोग केले असून त्यातून आपल्या आयुष्यात समस्या निर्माण होत असल्याचे कैलास म्हणत होता. या रागाच्या भरात कैलास आणि त्याच्या आजीमध्ये खूप भांडणे देखील होत होती. या रागाच्या भरात कैलासने कुऱ्हाडीने वार करुन आपल्या आजीचा जीव घेतला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक: २०१९ वर्षात महाराष्ट्रातून सर्वाधिक महिला बेपत्ता; NCRB डेटा