घरताज्या घडामोडीरणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजूर करा; वर्षा गायकवाडांचे आदेश

रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजूर करा; वर्षा गायकवाडांचे आदेश

Subscribe

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजी यांना अमेरिकेची स्कॉलरशीप जाहीर झाली आहे. या स्कॉलरशीपसाठी डिसले गुरुजी यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना डिसले गुरुजी यांनी रजेसाठी अर्ज केला होता. परंतु या अर्जात काही त्रुटी असल्याने अर्ज मंजूर करण्यात आला नाही.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजी यांना अमेरिकेची स्कॉलरशिप जाहीर झालीय. या स्कॉलरशिपसाठी डिसले गुरुजी यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांकडे डिसले गुरुजी यांनी रजेसाठी अर्ज केला होता. परंतु या अर्जात काही त्रुटी असल्याने अर्ज मंजूर करण्यात आला नाही. अर्ज मंजूर करण्यात आला नसल्याचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे डिसले गुरुजी यांच्या विरोधातील मागील तीन वर्षं गैरहजर असल्याचा अहवाल सादर करत त्यांच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आता रणजितसिंह डिसले यांचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. डिसले यांना अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजूर करा, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेत.

 काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

जगविख्यात रणजित डिसले गुरुजी यांना एक शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. जेव्हा डिसले गुरुजींच्या संदर्भात बातम्या आल्या त्यावेळी सोलापूरच्या सीओशी बोलणे झाले. त्यांना आम्ही सांगितले की, डिसले गुरुजींना शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे आहे तर, त्यांना तातडीने परवानगी द्यावी, यासाठी काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रक्रियेला सुरुवात झाली असून, त्यांना लवकरच परवानगी मिळेल. त्यामुळे सर्व त्रुटी दूर करून डिसले गुरुजींच्या रजेचा अर्ज मंजूर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला वर्षा गायकवाड यांनी दिलेत. याशिवाय वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात रणजित डिसले यांना फोन केल्याचे देखील सांगितले आहे. याशिवाय हा वाद नेमका कसा उफाळून आला आणि यामागील नेमके कारण काय आहे? याबाबत चौकशी करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच रणजितसिंह डिसले यांच्यासह शिक्षण विभागाच्या कामकाजाचा अहवाल मागवला आहे.

- Advertisement -

रणजितसिंह डिसले यांनी मानले आभार

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले यांनी रजा मंजूर करण्याचे आदेश दिल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे त्यांनी आभार मानले आहे. याशिवाय, येत्या 25 जानेवारीपर्यंत अमेरिकेला जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहे. फुल स्कॉलरशिपच्या संधीला मी मुकणार नाही असे म्हणत, रणजितसिंह डिसले यांनी वर्षा गायकवाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी कोरोना काळात मुलांना वेगवगेळे प्रयोग करुन शिक्षण दिले आहे. त्यांच्या कामाची दखल जगाने घेतली आहे. परदेशात मुलांना कसं शिक्षण दिले जाते याचा अभ्यास त्यांनी केला आहे. डिसले गुरुजींना वर्ल्ड बँक शिक्षण सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाची लाट पुढील 8 ते 15 दिवस राहू शकते, अजित पवारांचं भाकीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -