घरमहाराष्ट्रमुलं होत नसल्याने कुत्रा पाळला, पण त्याचेही निधन झाल्याने विरारमधील दाम्पत्याची आत्महत्या

मुलं होत नसल्याने कुत्रा पाळला, पण त्याचेही निधन झाल्याने विरारमधील दाम्पत्याची आत्महत्या

Subscribe

गेली अनेक वर्षे मुलबाळ होत नसल्याने नालासोपारा परिसरात एका दाम्पत्याने कुत्रा पाळला,परंतु या कुत्र्याचेही निधन झाल्याने दाम्पत्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कुत्र्याच्या विरहात दाम्पत्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु या आत्महत्येमागे आणखी काय वेगळे कारण आहे का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

नालासोपाऱ्यातील गणेशनगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. विजय कदम (वय ५४) आणि त्यांची पत्नी जयश्री कदम (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केलेल्या दाम्पत्यांचे नाव आहे. मृत विजय कदम मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. तर त्यांची पत्नी जयश्री गृहिणी होत्या. त्यांना कोणीही मुलबाळं नव्हतं. त्यामुळे घरात त्यांनी एक कुत्रा पाळला होता. मात्र या कुत्र्याचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले. या कुत्राच्या निधनाने या दाम्पत्याने जबरदस्त मानसिक धक्का बसला. आणि या विरहातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी संबंधित दाम्पत्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. मात्र उपचारांनंतर हे दाम्पत्य कोरोनातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले. यावेळी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचे निधन झाले. यामुळे दोघांनाही जब्बर मानसिक धक्का बसला आणि यातून दोघेही नैराश्येत गेले. यातून सोमवारी दुपारी दोघांनीही घराच्या छताला गळफास लावून जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनीही दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक तपास केला. दरम्यान संबंधित दाम्पत्य मागील काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती शेजारच्यांनी दिली आहे.


Coronavirus India Update: देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्येत तब्बल ७ हजारांची वाढ, तर रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -