घरमहाराष्ट्रपंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा; राजकीय चर्चांना उधाण

पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा; राजकीय चर्चांना उधाण

Subscribe

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सकाळी 10 वाजता जीएसटी विभागाचा छापा पडला. जीएसटीचे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहेत. आतापर्यंत विरोध पक्षांवर चौकशी होत होती, मात्र आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर चौकशी होत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा होत होती, तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाकडून कारवाई होत आहे.

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, त्यांचे घोटाळे बाहेर काढले जातात, असा आरोप गेल्या काही महिन्यात विरोधी पक्षांकडून वारंवार करण्यात आला आहे. मात्र आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर छापेमारी झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील भगवान गडावरील नारळी सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे माध्यमांमध्ये चर्चेत आल्या होत्या. आजदेखील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी झाले असतानाच परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.

- Advertisement -

जीएसटीची कारवाई तांत्रिक कारणाने
जीएसटीच्या अधिकाऱ्यांना कारखान्याकडे जाण्याची गरज नव्हती, कारण कारखाना खूप दिवसांपासून बंद आहे, कारखान्याला कुलुप आहे. 2011 पासून कमी उत्पादन, त्यानंतर 2013-14 आणि 15 चा प्रचंड दुष्काळ नंतर उसाचा अभाव यामुळे कारखाना अत्यंत आर्थिक हालाखीत आहे. मुंडे साहेबांनी त्यावेळी कर्ज घेण्याचा प्रयत्न केला होता, पण राजकारणामुळे त्यांना कर्ज मिळाले नाही. त्यामुळे त्यांना अधिकच्या व्याजाने केंद्रीय राष्ट्रीय बँकातून कर्ज घ्यावे लागले. यासर्व गोष्टीचा हा परिणाम आहे, बाकी काही नाही. मी जीएसटी अधिकाऱ्यांना कुलुप उघडून कागदपत्र दिली आहे. ही कारवाई का होत आहे हे मला माहिती नाही, पण मला हळुहळु कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -