घर ताज्या घडामोडी Deepak Kesarkar: मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन करणार - पालकमंत्री दीपक केसरकर

Deepak Kesarkar: मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन करणार – पालकमंत्री दीपक केसरकर

Subscribe

मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. येथे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. या सर्व परिसराचे सुशोभीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या कामांच्या प्रगतीचा शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा घेतला. या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन केली जाणार असून ही कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

मुंबई शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुशोभीकरणाच्या कामांच्या सद्यस्थितीचा पालकमंत्री केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

पालकमंत्री केसरकर म्हणाले की, मुंबईमध्ये पर्यटन वाढीसाठी मोठी क्षमता आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सुशोभीकरणाची जी कामे सुरू आहेत, ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी आवश्यक आहे ती तातडीने घ्यावी.

मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, कोळीवाडे, माहीम रेती बंदर ते दादर चौपाटीपर्यंत सी साईड वॉक वे, वरळी समुद्र किनाऱ्यावरील इमारतींवर लाईट आणि लेझरद्वारे रोषणाई, तेथील सुशोभीकरण, शिवतीर्थ येथील परिसराचे सुशोभीकरण, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारतींची दुरूस्ती आणि सुशोभीकरण, खोताची वाडी येथे पारंपरिक पद्धतीने जतन आणि संवर्धन आदी प्रकल्पांबाबत या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.

- Advertisement -

आमदार सदा सरवणकर यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. तर जिल्हाधिकारी निवतकर यांनी प्रास्ताविकाद्वारे विविध योजनांबाबत माहिती दिली. अशाच प्रकारचा उपक्रम दर महिन्याला आयोजित करून वंचित घटकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.


हेही वाचा : काँग्रेसकडून लोकसभेची तयारी; पटोलेंच्या अध्यक्षतेखाली उद्या होणार मतदारसंघनिहाय बैठक


 

- Advertisment -