घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीचा पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला अखेर ठरला

महाविकास आघाडीचा पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला अखेर ठरला

Subscribe

महाविकास आघाडीचे खातेवाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार असून, आता पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला देखील ठरल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्या पक्षाला त्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेला १३ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद, राष्ट्रवादीकडे १२ तर काँग्रेसकडे ११ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. पालकमंत्रिपदासाठी तीन ते चार जिल्ह्यावर तीनही पक्षांनी दावा ठोकलाय, त्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

अनिल परब होणार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री?

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सिधुंदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे अनिल परब यांना मिळण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे यावेळी सिधुंदुर्ग जिल्ह्यात एकही मंत्रिपद न दिल्याने यावेळी मुंबईतून मंत्रिपद मिळालेल्या अनिल परब यांना पालकमंत्री करण्यात येणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

असे असतील संभाव्य पालकमंत्री

मुंबई शहर – आदित्य ठाकरे

मुंबई उपनगर – नवाब मलिक

- Advertisement -

पालघर – जितेंद्र आव्हाड

ठाणे – एकनाथ शिंदे

रायगड – सुभाष देसाई

रत्नागिरी – उदय सामंत

सिंधुदुर्ग – अनिल परब

जळगाव – गुलाबराव पाटील

धुळे – दादा भुसे

अहमदनगर – शंकरराव गडाख

नांदेड – अशोक चव्हाण

लातूर – अमित देशमुख

नाशिक – छगन भुजबळ

अमरावती – बच्चू कडू किंवा यशोमती ठाकूर

पुणे – अजित पवार

कोल्हापूर – सतेज पाटील किंवा हसन मुश्रीफ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -