घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSambhajinagar riots : विरोधक राजकारण करत आहेत, दंगलीवरील आरोपांवरुन पालकमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Sambhajinagar riots : विरोधक राजकारण करत आहेत, दंगलीवरील आरोपांवरुन पालकमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Subscribe

Guardian Minister Sandipan Bhumre on Sambhajinagar riots allegations  छत्रपती संभाजीनगर –  किराडपुरा भागात बुधवार रात्री घडलेल्या घटनेतील आरोपींना संध्याकाळपर्यंत अटक करण्यात येऊन कडक शिक्षा केली जाईल, असे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री भूमरे हे बुधवारी शहराबाहेर होते. गुरुवारी सकाळी त्यांनी किराडपुरा भागात भेट दिली आणि घटनास्थळाची पाहाणी केली. किराडपुरा, राममंदिर परिसरात सध्या शांतता आहे. मात्र घडलेली घटना ही वाईट होती, असे पालकमंत्री भूमरे म्हणाले.

संदिपान भूमरे यांनी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची भेट घेतली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितल्याचे पालकमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना संध्याकाळपर्यंत अटक करण्यात येईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’

- Advertisement -

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात दोन गटातील वादानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात

आज राम नवमी आहे, नागरिकांनी शांततेत आणि उत्साहात सण साजरा करावा. यापुढे शहरात अशा घटना होणार नाही, याची दक्षता पोलिस घेतील. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचे पालक मंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या दंगलीसाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. हे आरोप पालकमंत्री भूमरे यांनी फेटाळून लावले असून विरोधी पक्षनेते राजकारण करत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

बुधवारी रात्री घडलेल्या घटने प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु असून आज संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक केले जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. दोन दिवसांनंतर ( २ एप्रिल) संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे, तर त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाकडून सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. त्यामुळे शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा : Sambhajinagar Riots : भाजप आणि एमआयएम राजकीय स्वार्थासाठी… अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -