घरमहाराष्ट्रअखेर 'त्या' गावांतील पाणी प्रश्नासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

अखेर ‘त्या’ गावांतील पाणी प्रश्नासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

Subscribe

कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांना सध्या अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नांदिवली पंचानंद, सागाव, सांगार्ली, भोपर, देसलेपाडा, सोनारपाडा या मोठ्या लोकसंख्येच्या गावांना कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. २७ गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आ. सुभाष भोईर व नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिका, एमआयडीसी तसेच लघु पाटबंधारे खात्याची संयुक्तिक बैठक लावण्याची मागणी केली होती. मागणीनुसार मंगळवारी जलसंपदामंत्र्यांच्या दालनात दुपारी १२ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. सुभाष भोईर, महापौर विनिता राणे उपस्थित राहणार आहेत.

२७ गावातील पाणीप्रश्नाबाबत महापालिका, एमआयडीसी, तसेच लघु पाटबंधारे विभाग यांच्यामधे समन्वय नसल्यामुळे नागरिकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. तीनही विभाग कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत जबाबदारी घेण्यास तयार होत नाही. त्यामुळे एमआयडीसी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व लघु पाटबंधारे विभाग यांच्यात एकवाक्यता असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा व २७ गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता अधिकाऱ्यांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यावर दुष्काळाचं सावट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी केंद्र सरकारचे पथक करणार आहे. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येणार आहे. सरकारच्या आठ उपाययोजनेमध्ये टॅंकर, चारा, वीज, विद्यार्थ्यांना शिक्षण, चारा छावण्या यांचा समावेश आहे.  परतीच्या पावसानं ओढ दिल्यानं बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. आता पुढच्या वर्षी मान्सूनपर्यंत दिवस कसे काढायचे हाच यक्ष प्रश्न बळीराजाला पडला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -