घरमहाराष्ट्र'या' कारणासाठी साजरा केला जातो गुढीपाडवा

‘या’ कारणासाठी साजरा केला जातो गुढीपाडवा

Subscribe

गुढीपाडवा या सणापासून हिंदू नव वर्षाला सुरुवा होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा १३ एप्रिल २०२१ ला महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक मराठमोळी वेषभुषा, दागदागिने परिधान करत घरोघरी गुढी उभारत, गोडाधोडाचा स्वयंपाक करत नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. मुंबईसह राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला जातो. परंतु यंदाचे वर्ष आणि याआधीचे वर्ष कोरोना विषाणूचयाा संसर्गामुळे घरोघरीच साजरा करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्रात गेली दोन वर्षे गुढीपाडव्याचा भव्य उत्साह कुठेतरी मावळला आहे.

मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. यासाठी उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी अथवा नवी कोरी साडी बांधतात. यावर चांदीचा अथवा तांब्याचा गडू उपडा घालतात. त्यावर कडूलिंबाची दहाळी व आंब्याची पाने व साखरेच्या गाठी फुलांचा हार गुढीला चढवतात. व घराबाहेरील एका उंच ठिकाणी गुढी उभारतात.

- Advertisement -

‘यासाठी’ साजरा करतात गुढीपाडवा

पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके शालिवाहन शकावर आधारित आहेत. त्यामुळे इतर काही प्रातांत कुठे कार्तिक प्रतिपदेला तर कुठे मेष राशीतील सुर्यप्रवेशाला वर्षाची सुरुवात झाली असे मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदुर रुढ आहे. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष वाटण्यामागणे कारण असे की, हा शक सुरु करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय राजा होता. या शकाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडवा सण आहे. यादिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती पूजन केले जाते. हिंदू नवव्रर्षाचा प्रारंभ करणारा हा दिवस घरोघरी गुढी उभारुन साजरा केला जातो.

महाभारतातील आदिपर्वात उपरिचर राजा इंद्राने दिलेली कळकाची काठी इंद्राच्याच आदरार्थ जमिनीत रोवत त्याची दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी पूजा केली. या परंपरेचा आदर करत अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, दागदागिने घालून पुष्पमाला बांधून तिची पूजा करु लागले. हा उत्सव महाभारतातील आदिपर्वात वर्ष प्रतिपदेस केला जात होता तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांमध्ये हा उत्सव साजरा करण्याची पद्धत तिथी प्रमाणे वेगळी आहे. याच दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्माण केले असे मानले जाते. हीच परंपरा कायम ठेऊन गुढीपाडवा साजरा केला जातो.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -