ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गाईड्सना आता इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण

Forest department ban mobile at tadoba national park

चंद्रपूर – ताडाबो व्याघ्र प्रकल्पात असलेल्या गाईड्सना आता इंग्रजी संभाषणासाठी विशेष क्लास सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पात अनेक देशी-परदेशी पर्यटक येत असतात, त्यानिमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – Tadoba Tiger Conservation: व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा जागतिक स्तरावर सर्वोत्तम पर्यटन स्थळ होण्यासाठी आराखडा सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

आंतरराष्ट्रीय दर्जाचं असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अनेक पर्यटक येत असतात. दक्षिण भारतातून आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मराठी व हिंदी येत नसल्याने स्थानिक गाईड त्यांना ताडोबाची माहिती देऊ शकत नाहीत. हीच अडचण ओळखून पर्यटकांना टायगर सफारी घडविणाऱ्या गाईड्ससाठी आता ताडोबा प्रशासनाच्या वतीने इंग्लिश स्पिकिंगचे विशेष क्लास सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली आहे.

ताडोबात असलेले गाईड्स हे स्थानिक आदिवासी गावातील आहेत. त्यांचं शिक्षण जुजबी असल्याने त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे विदेशी पर्यटकांशी संवाद साधणे कठीण होते. त्यामुळेच येथील गाईड्ससाठी क्लास सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – ताडोबा भूसंपादनासाठी सल्लागार पशिने यांची नियुक्ती