कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून सातत्याने गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यातील विविध भागांत आतापर्यंत अनेकांना जीबीएस संसर्गाची लागल झाली आहे. या सगळ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, आता GBS संसर्गाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. पुण्यानंतर कोल्हापुरात दोन जणांना GBSची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. (Guillain Barre Syndrome after Pune now two patients test positive in Kolhapur)
पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या 111 वर पोहोचली आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर पोहचली होती. एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. यातील 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे पुण्यात एकाच दिवसांत 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
पुण्यातील जीबीएस या आजाराने संक्रमित झालेले दोन रुग्ण कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. कोगनोळी कर्नाटक येथील 60 वर्षांचे वृद्ध आणि हुपरी येथील 6 वर्षांच्या मुलावर दोन दिवसांपासून सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे.
GBS ची लक्षणं कोणती?
प्राथमिक लक्षणांमध्ये हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलण्यास व गिळण्यास त्रास होणे असून या आजाराचे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने याचा अभ्यास शासनाच्या समितीच्यावतीने सुरू आहे.
हेही वाचा – GBS : पुण्यातील आजाराप्रकरणी केंद्र सरकार अॅक्शन मोडवर, स्थानिक प्रशासनाला करणार मदत