Homeताज्या घडामोडीGuillain Barre Syndrome : पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 127 वर; सिंहगड परिसर...

Guillain Barre Syndrome : पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 127 वर; सिंहगड परिसर ठरतोय हॉटस्पॉट!

Subscribe

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या संसर्गाने पुण्यात आहाकार माजवला आहे. पुण्यासह आजुबाजूच्या परिसरात हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये 20 ते 29 वयोगटातील रुग्ण सर्वाधिक आहेत. अशात, दोन संशयितांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे.

Guillain Barre Syndrome पुणे : गुलेन बॅरी सिंड्रोमच्या संसर्गाने पुण्यात आहाकार माजवला आहे. पुण्यासह आजुबाजूच्या परिसरात हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये 20 ते 29 वयोगटातील रुग्ण सर्वाधिक आहेत. अशात, दोन संशयितांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे. विषेश म्हणजे पुणे शहर परिसरात आढळून आलेल्या जीबीएस रुग्णांपैकी जवळपास 80 टक्के रुग्ण हे सिंहगड रस्ता परिसरात आढळून आले आहेत. त्यात एकाच दिवसात 16 रुग्णांची नोंद झाल्याने आता चिंता वाढली आहे. (Guillain Barre Syndrome patients death of two suspects immediate resurvey in sinhagad area)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आढळून आलेल्या जीबीएस रुग्णांपैकी जवळपास 80 टक्के रुग्ण हे सिंहगड रस्ता परिसरात आढळून आले आहेत. या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी महापालिकेच्या सर्वेक्षण पथकांकडून पुन्हा या रुग्णांचे तातडीने सर्वेक्षण करून घेतले. दरम्यन या भागातील महापालिकेच्या पथकांनी अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले होते.

सिंहगड परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण

पुण्यात सध्या जीबीएसचे रुग्ण वाढत असून सर्वाधिक रुग्णसंख्या ही सिंहगड रस्ता परिसरात असल्याची माहिती समोर येत आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांनी रूग्ण आढळल्यानंतर घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचे सर्वेक्षण केले. त्यात अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आलेली होती. या सर्वेक्षणात अशी लक्षणे असलेले एकूण 144 रुग्ण आढळून आले होते.

कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?

  • दूषित पाणी किंवा अन्न खाणे.
  • आणि ओटीपोटात वेदना होणे.
  • काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
  • डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

  • अतिसार
  • पोटदुखी
  • ताप
  • मळमळ किंवा उलट्या

हेही वाचा – Maharashtra Police : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचा राजीनामा? कायदा-सुव्यवस्था सदानंद दातेंच्या हाती