Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण गुजरात निवडणूक 'नमस्कार आमदारजी...' पत्नी रिवाबाच्या विजयानंतर रवींद्र जडेजाचे खास ट्विट

‘नमस्कार आमदारजी…’ पत्नी रिवाबाच्या विजयानंतर रवींद्र जडेजाचे खास ट्विट

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे. यामुळे गुजरातमध्ये आता भाजपकडून विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. या निवडणुकीत भारताचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा देखील जामनगर उत्तर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. पत्नीच्या विजयावर जडेजा खूपचं आनंदी दिसत असून त्याने सोशल मीडियावर रिवाबाबद्दल एक पोस्ट टाकली आहे. या ट्विटमध्ये जडेजाने रिवाबाचे अभिनंदन करण्यासोबतच जामनगरच्या लोकांचे आभार मानले आहेत.

जडेजाने ट्विटमध्ये लिहिले की, ‘नमस्कार आमदारजी. या विजयासाठी तुम्ही खरोखरच पात्र आहात. जामनगरच्या जनतेचा विजय झाला आहे. मी सर्व लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आशापुरा मातेला विनंती आहे की, जामनेरची कामे खूप चांगली होतील. जय माताजी.

- Advertisement -

जडेजा बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. सप्टेंबरमध्ये त्याने आशिया चषकातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र तेव्हापासून तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. या काळात जडेजाने पत्नीला जिंकवण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. त्याने निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेत रोड शोमध्येही दिसला.

- Advertisement -

या रोड शोदरम्यान जडेजाने त्याच्या चाहत्यांनाही ऑटोग्राफ देताना दिसला. विजयानंतर रिवाबाच्या रोड शोमध्ये जडेजाही उपस्थित होता. गुजरातमध्ये भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकल्या. त्याचवेळी जामनगर उत्तरमधून रिवाबानेही मोठा विजय मिळवला. त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आम आदमी पार्टीचे करशनभाई यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रिवाबा यांना एकूण 88,835 मते मिळाली, तर आप उमेदवाराला 35,265 मते मिळाली. रिवाबाने पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली.


महाराष्ट्राला एकही इंच देणार नाही, सीमाप्रश्नी बोम्मईंनी पुन्हा डिवचलं

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -