समाजसेविका तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरात ATS ची कारवाई

Gujarat ATS action against social worker Teesta Sitalwad

गुजरात दंगलीप्रकरणी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने सामजिक कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाड यांना मुंबईतून ताब्यात घेतले आहे. एटीएसचे पथक सीतलवाड यांच्या मुंबईतील घरी पोहोचले आणि त्यांना सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नेले, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे.

तीस्ता सीतलवाड यांच्या एनजीओविरोधातील खटल्याच्या संदर्भात हे पाऊल उचलण्यात आहे. गुजरात दंगलीशी संबंधित झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. यातच सीतलवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

2006 मध्ये झाकियाने पीएम मोदींविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज केला होता. 2007 मध्ये गुजरात हायकोर्टाने तो न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठवला. दुसरीकडे, 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दंगलीशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी माजी सीबीआय संचालक आरके राघवन यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली. तीस्ता सीतलवाड यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीच्या तपासावर सातत्याने लक्ष ठेवले होते.