घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरगुजरातच्या बसचा महाराष्ट्रात अपघात, पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात झाडाला धडक

गुजरातच्या बसचा महाराष्ट्रात अपघात, पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात झाडाला धडक

Subscribe

औरंगाबाद – गुजरातच्या बसचा औंरगाबादमध्ये भीषण अपघात झाला आहे. औरंगाबादवरून अहमदाबादकडे जात असताना कन्नडजवळ हा अपघात झाला असून या अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना कन्नड शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

गुजरात शासनाची बस महाराषट्रात औंरगाबाद ते अहमदाबाद असा प्रवास करत होती. या गाडीत १० ते १५ प्रवासी होते. कन्नड गावाजवळील काश्मिरा हॉटेल समोर पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्न बस झाडाला जाऊन आदळली, या धडक एवढी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुरा झाला आहे.

- Advertisement -

काल पाथर्डीत झाला होता अपघात

बुलडाणा जिल्ह्यातील पाथर्डी घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मेहकरवरून खामगावकडे जात असलेल्या बसच्या पाथर्डीच्या घाटामध्ये अपघात झाला. त्यावेळी बस एका रस्त्याकडील झाडाला धडकली. या बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाथर्डी घाटात एसटी बसचा भीषण अपघात, ११ प्रवासी जखमी

या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोलीस आणि अॅम्बुलन्सही पोहोचली असून मदतकार्य वेळेत होऊ शकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -