Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र विजयकुमार गावितांना मंत्रीपदामागे 'गुजरात कनेक्शन'

विजयकुमार गावितांना मंत्रीपदामागे ‘गुजरात कनेक्शन’

Subscribe

नाशिक : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंगळवारी (दि.९) झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र या मागे भाजपचे गुजरात कनेक्शन असल्याचे सांगितले जाते. गजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांना मंत्रीपद दिले असल्याचे सुत्रांकडून समजते. गुजरातमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे ही मते भाजपकडे वळविण्यासाठी गावितांच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो म्हणून त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याचे सांगितले जाते.

डिसेंबरमध्ये गुजरातच्या निवडणुक होत आहे. गुजरातच्या बारडोली आणि सुरत भागातील आदिवासींना मोबिलाइज करण्यासाठी गावित यांचा फायदा होऊ शकतो याच उददेशने गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी विजयकुमार गावित यांची वर्णी लावली आहे असे सांगितले जाते. याकरीता स्वतः सी.आर.पाटील यांनी फिल्डिंग लावल्याचेही समजते. गुजरात निवडणुक काळात बारडोली आणि सूरत भागात फिरवता येऊ शकते असाही एक अंदाज आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रचारासाठी विजयकुमार गावित यांची कन्या, खासदार डॉ. हिना गावित या सहभागी झाल्या होत्या. महिला खासदार म्हणून हिना गावित यांनी मुर्मू यांच्यासोबत संपूर्ण देशात भ्रमण केले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आदिवासी खासदारांना एकत्र करण्यात हिना गावित यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतही गावित बापलेकींना आदिवासी भागात प्रचारासाठी नेण्याची भाजपची योजना आहे त्यामुळेच गावित यांना मंत्रीपद देउन बळ देण्यात आल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -