घरदेश-विदेशघराणेशाहीविरोधात जनआक्रोश लोकशाहीसाठी शुभसंकेत, तरुणांना विकास हवाय; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

घराणेशाहीविरोधात जनआक्रोश लोकशाहीसाठी शुभसंकेत, तरुणांना विकास हवाय; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने सलग सातव्यांदा सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपाच्या मुख्य कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मोदींनी जनता जनार्दनापुढे नतमस्तक होतो म्हणत आशीर्वाद घेतले. जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा गंध आम्हांला येत आहे, जिथे भाजपचा थेट विजय झाला नाही, तिथली मतांची टक्केवारी हा भाजपबद्दलच्या आपुलकीचा पुरावा आहे. बिहारच्या रामपूरमध्ये भाजपचा विजय, बिहार पोटनिवडणुकीत भाजपची कामगिरी हे आगामी दिवसांचे स्पष्ट संकेत आहे. म्हणत मोदींनी निवडणूक आयोगाचे आणि प्रत्येक पक्षाचे अभिनंदन मानले.

हिमाचलमध्ये 1 टक्‍क्‍यांनी मागे पडलो तरी विकासाप्रतीची वचनबद्धता 100 टक्के 

मोदी म्हणाले की, हिमाचलच्या प्रत्येक मतदाराचाही मी आभारी आहे. हिमाचलच्या निवडणुकीत एक टक्का कमी फरकाने विजय-पराजय निश्चित झाला आहे. हिमाचलमध्ये कधीच इतक्या कमी फरकाने निकाल लागलेला नाही, याचा अर्थ जनतेनेही भाजपाला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मी हिमाचलच्या जनतेला आश्वासन देतो, भाजप जरी 1 टक्‍क्‍यांनी मागे पडला असला तरी विकासाप्रतीची वचनबद्धता 100 टक्के असेल. केंद्र सरकार हिमाचलची प्रगती कधीच कमी होऊ देणार नाही, असे आश्वासनही मोदींनी दिले आहे.

- Advertisement -

घराणेशाहीविरोधात जनआक्रोश लोकशाहीसाठी शुभसंकेत

भाजपला मिळालेला जनसमर्थन देखील महत्त्वाचा आहे, कारण भारताने अमृत कालात प्रवेश केला आहे. भाजपला मिळालेला जनसमर्थन हे नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, तरुणांच्या विचारसरणीचे प्रकटीकरण आहे. गरीब, दलित, वंचित, मागास, शोषित आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी आहे.  सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपमध्ये आहे. भाजपला मिळणारे जनसमर्थन दर्शवते की, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराविरुद्ध  जनआक्रोश सतत वाढत आहे आणि हे सुदृढ लोकशाहीसाठी शुभसंकेत आहे. यावेळी गुजरातने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. मी सर्व भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि गुजरातच्या जनतेला विशेष सलाम करतो, असंही मोदी म्हणाले.

निवडणुकीच्या वेळी मी म्हणालो होतो की, यावेळी नरेंद्रचा विक्रम मोडायला हवा. मी वचन दिले होते की. भूपेंद्र नरेंद्रचा विक्रम मोडेल, म्हणून नरेंद्र जी कठोर परिश्रम करतील. गुजरातच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड लोकांनी मोडले आहेत. गुजरातच्या जनतेने भाजपला सर्वात मोठा जनादेश देऊन नवा इतिहास रचला आहे, असं प्रतिपादन मोदींनी केले आहे.

- Advertisement -

तरुणांना विकास हवाय

तरुणांनी भाजपचे काम पाहिले, तपासले आणि त्यावर विश्वास ठेवला. गुजरातमध्ये असे एक कोटीहून अधिक मतदार होते ज्यांनी या निवडणुकीत मतदान केले, पण हे असे मतदार होते ज्यांनी काँग्रेसचा दुराचार कधीच पाहिला नव्हता. त्यांनी फक्त भाजपचे सरकार पाहिले होते. तपासून, चाचपणी करूनच निर्णय घेतात, विश्वास असेल तरच ते मतदान करतात, असा तरुणांचा स्वभाव आहे. आज तरुणांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान करून सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यामागचा संदेश अगदी स्पष्ट आहे, तरुणांनी आमच्या कामाची चाचपणी केली, चाचपणी केली आणि त्यावर विश्वास ठेवला, याचा अर्थ तरुणांना भाजपचे विकासाचे राजकारण हवे आहे, तरुण वर्ग ना जातीवादाच्या किंवा कुटुंबवादाच्या प्रभावाखाली येत नाही. त्यांची मने केवळ दृष्टी आणि विकासाने जिंकता येतात आणि भाजपकडे या दोन्ही गोष्टी आहेत. असही मोदी म्हणाले.


बेजबाबदार नेत्याने गुजरातच्या जनतेची माफी मागावी, जे.पी. नड्डांचा केजरीवालांना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -