घरमहाराष्ट्रमराठी माध्यमाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडे

मराठी माध्यमाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडे

Subscribe

मराठी माध्यमाच्या सहावीच्या पुस्तकात गुजराती भाषेतील धडे जोडण्यात आली आहेत. या विषयावरुन विधानपरिषदेत आज बराच गदारोळ झाला.

सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती धडे छापल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल तटकरे यांनी समोर आणल्यानंतर विधानपरिषदेमध्ये जोरदार रणकंदन माजले. मराठी अस्मितेचा मुद्दा राष्ट्रवादीच्या आमदारांनी उचलून धरल्यामुळे सभागृह दोनवेळा तहकुब करावे लागले आणि सभापतींनी सरकारला खुलासा करण्याचे निर्देश दिल्यानंतरही विरोधकांनी अस्मितेचा प्रश्न उचलून धरल्यामुळे शेवटी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

विधानपरिषदेमध्ये औचित्याच्या मुद्दयाद्वारे आमदार सुनिल तटकरे यांनी इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकामध्ये गुजराती धडे असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे पहिल्यांदा कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र त्यानंतर सभागृह सुरु झाल्यानंतर सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी असे पुस्तकच नाही, असा दावा केल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला त्यामुळे पुन्हा १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब झाले.

- Advertisement -

फक्त काही पुस्तकात प्रिटिंग मिस्टेक

सभागृह सुरु झाल्यानंतर सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्याकडे सहावीचे भूगोल पुस्तक आहे, परंतु त्या पुस्तकात एकही गुजराती पान नाही आणि हे पुस्तक जुनमध्ये छापण्यात आले आहे. त्यामुळे आमदार सुनिल तटकरे यांना जर असे काही सापडले असेल तर त्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच का सादर केले नाही? असा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात आणखी गोंधळ सुरु झाला.

Marathi geography
मराठी माध्यमाच्या पुस्तकात भूगोलाचे धडे

गुजरातमध्ये छपाई केल्यामुळे घोळ

या पुस्तकाच्या एक लाख प्रती गुजरातमधील श्लोक प्रिंटर या अहमदाबादच्या कंपनीकडून छापून घेतले असल्याचे सांगितले. हा महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न असून भूगोल पुस्तकामध्ये १५ गुजराती पाने आली कशी, असा सवाल केला. सरकार गुजरातच्याबाबतीत लाचार होत असेल, परंतु महाराष्ट्रातील माणूस कधीही गुजरातपुढे लाचार होणार नाही, असा इशारा सरकारला दिला. त्यामुळे राज्यसरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जाहीर खुलासा करावा, अशी मागणी मुंडे यांनी केली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जे घडले ते विद्यार्थ्यांच्यादृष्टीने घातक असल्याचे सांगितले. हा अस्मितेचा मुद्दा जितका महत्वाचा आहे, तितकाच तो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत राज्य सरकारने यावर सखोल खुलासा करावा, असे निर्देश दिले.

- Advertisement -

Marathi geography book

 

दरम्यान बालभारतीच्या वेबसाईटवर भुगोलाच्या पुस्तकाची पीडीएफ पुर्ण मराठीतच उपलब्ध आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयात याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, केवळ पाच-दहा पुस्तकामध्ये चुकून दोन-तीन गुजराती पुस्तकाची पाने छापली गेली आहेत. सर्व पुस्तकात ही चुक झालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -