घरताज्या घडामोडीgulab cyclone : वारंवार पावसामुळे नुकसान, मंत्रिमंडळात सरसकट पंचनाम्यांची मागणी करणार -...

gulab cyclone : वारंवार पावसामुळे नुकसान, मंत्रिमंडळात सरसकट पंचनाम्यांची मागणी करणार – राजेश टोपे

Subscribe

शाळा, मंदिर सुरु करण्याबाबत नियमावली जाहीर करणार

मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली असल्यामुळे मोठ्या प्रामाणात नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे करु
पंचनाम्यांचे आदेश दिले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पंचनामे जलदगतीने सुरु आहेत. ९ सप्टेंबरपर्यंतचे पंचनाममे पुर्ण झाले आहेत. तसेच २० सप्टेंबरपासूनचे पंचनामे येत्या ५ ते ६ दिवसांत पुर्ण होतील अशा सुचना मदत व पुनर्वसन मंत्री यांनी दिल्या आहेत. कलेक्टर विजय राठोड यांना गतीने काम करण्यास सांगितले आहे. वित्त हानी आणि पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे.

मंत्रिमंडळात विषय फार प्रकर्षनाने मांडणार आहेत. सतत पाऊस पडतो आहे आणि सतत अतिवृष्टी होत आहे. ६५ एमएमच्या वर पाऊस असल्यामुळे पंचनामे करण्यापेक्षा आता सरसकट पंचनामे गृहीत धरावेत. मोठया प्रमाणात पाऊस झाल्यावर ठिकठिकाणी जाऊन पंचानमे करणं काहीकाही रेवेन्यू सर्कलमध्ये शक्य नाही. अशावेळी परिस्थितीची माहिती घेऊन वैयक्तित पंचनामे करण्याची जी पद्धत असते. त्याला फाटा देऊन सरसकट पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शाळा, मंदिर सुरु करण्याबाबत नियमावली जाहीर करणार

शाळा सुरु करणं ४ ऑक्टोबर आणि मंदिर सुरु करण्यासाठी ७ ऑक्टोबरला सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. आता याच्या अटी शर्तींच्या आधारवर काळजी घेऊन सुरु करावे याबाबत आरोग्य विभाग तातडीने नियमावली जाहीर करेल. नियमावलीमागे उद्धेश आहे की, कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये आणि संक्रमण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये याबाबतची एसओपी लवकरच निर्गमित करु असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आरोग्य विभागाच्या परिक्षांवर प्रतिक्रिया

आरोग्य विभागाच्या परिक्षेतील कंपनी काळ्या यादीत नाही की आहे? हा सगळा विषय आरोग्य विभागाचा आहे. हा विषय जीएडी अंतर्गत येत असलेल्या आयटी विभागाचा आहे. त्यामुळे तो निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. त्यानुसार आम्हाला माहिती दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Pakistan Unemployment : पाकिस्तानात बेरोजगारीचा उच्चांक, शिपायाच्या १ पदासाठी १५ लाख अर्ज


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -