घरताज्या घडामोडीराज ठाकरेंनी मागणी करुन मोठं काम केलं नाही; गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

राज ठाकरेंनी मागणी करुन मोठं काम केलं नाही; गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

Subscribe

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला ५० हजार रुपयाची मदत करण्याची मागणी

मराठवाडा आणि विदर्भामध्ये गुलाब चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेताचे प्रचंड नुकसान झालं आहे. मराठवाड्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पंरतु राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही असा खोचक टोला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. गुलाबराव पाटील नाशिक दौऱ्यावर असून त्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचा आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील नुकसानीचे पाहणी केली. गुलाबराव पाटील यांना राज ठाकरेंच्या मागणीवरुन चांगलाच टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा असे म्हणत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला ५० हजार रुपयाची मदत करण्याची मागणी केली होती. यावर गुलाब पाटील यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करण्याची गरज नाही. मागणी करणं सोप आहे परंतु प्रत्यक्ष पंचनामे केल्यावरच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यात येईल अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

भुजबळ आणि कादेंनी वाद सोडवावा

शिवसेना आमदार सुहास कांदे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यातील वाद बसून सोडवला पाहिजे. कादेंना धमकी मिळाली असून त्यांनी धमकीला घाबरु नये असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच पालकांनी बालकाप्रमाणे वागू नये असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे विनंती केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अतिवृष्टीबाबत राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : केंद्राकडून मदत करताचा दुजाभाव लपून राहिलेला नाही; पूरग्रस्तांच्या मदतीवरुन अजित पवारांचं टीकास्त्र


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -