घरताज्या घडामोडीमाझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे, गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे, गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

Subscribe

राज्यात नगरपंचायतीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांची जीभ घसरली.

तीस वर्ष राहिलेल्या आमदारांना माझं चॅलेंज आहे. माझ्या मतदारसंघात या. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. मी गेल्यावरती आता रेट वाढवतील. चक्क योगायोग आहे. जळगाव जिल्ह्याचं भाग्य असेल तर जेव्हा जेव्हा कोणीही मंत्री झाले तेव्हा पाण्याची ख्याती मिळाली. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे पाणीपुरवठा मंत्री होते. असं गुलाबराव पाटील म्हणाले.

- Advertisement -

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नितेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलण्याएवढी उंची नाही. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी नितेश राणे यांच्या वडिलांना राजकारणात मोठे केले. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर काहीही बोलू नये, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला. असं विधान करत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. मात्र, गुलाबराव पाटील यांनी पलटवार करत नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिकेच्या नव्या गाइडलाइन्स जारी, न्यू ईयर पार्टीवर राहणार वॉच


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -