‘त्या’ शुक्राचार्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका

Gulabrao Patil

शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत, पण त्या शुक्राचार्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

गुलाबराव पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शुक्राचार्य कोण आहे, ते तुम्हाला माहिती आहे, कारण त्यांनी आमच्या पक्षाचा सत्यानाश केला आहे. बऱ्याच लोकांनी राजीनामे दिले आणि ते माझ्यामागे उभे राहत आहेत. आम्ही बंडखोर नाहीये, आम्ही शिवसेना थोडीच सोडली आहे, शिवसेना सोडून जर इतर पक्षात गेलो असतो तर बंडखोर.., आम्ही कोणत्याही पक्षात गेलो नसून आम्ही फक्त शिवसेना पक्षात आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदं सोडली, कुणी मायका लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही, असंही गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत. कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, तो पक्ष आम्ही वाचवतोय, असं पाटील म्हणाले.


हेही वाचा : …तर सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे निवडून येतील, रोहित पवारांचा