घरताज्या घडामोडीआता भाऊ नाही तर पाणीवाला बाबा, नवीन वर्षात गुलाबराव पाटलांचा संकल्प

आता भाऊ नाही तर पाणीवाला बाबा, नवीन वर्षात गुलाबराव पाटलांचा संकल्प

Subscribe

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपली रोखठोक भाषणं आणि त्यांच्या विविध प्रकारच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. मला आता भाऊ राहायचं नाहीये, तर पाणीवाला बाबा व्हायचंय, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे. यावेळी सरकारने ‘जल जीवन मिशन योजने’ अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे जे उदिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्याचा आणि बाळासाहेबांची शिवसेना गावागावापर्यंत पोहोचून जळगाव जिल्हा भगवामय करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, दुर्गम भागात पाण्याच्या योजना आम्ही सुरू केल्यानंतर लोकांना पाणी मिळू लागले आणि त्यांचा आम्हाला मिळू लागलेला प्रतिसाद हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण राहिला आहे. मात्र, ज्यावेळी शिवसेनेत धक्कादायक प्रकार घडला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आम्ही सांगितलेले ऐकले नाही. त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. परंतु हा आपल्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असल्याचं पाटलांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर ‘बेटा ठीक से चल नही तो फिर से एक्सीडेंट हो जायेगा’ हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो, असं पाटील म्हणाले. गाडीचा वेग जास्त झाला तर त्यासाठी ब्रेकरची गरज असते. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो, असं म्हणत पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला.

संभाजी राजे हे आमच्यासाठी धर्मवीर आहेत आणि धर्मवीरच राहणार आहेत. त्यांना कमी लेखणे चुकीचे आहे. अजित पवारांनी त्यांच्याबद्दल असं बोलणं उचित नाही. संभाजीराजे यांनी धर्मासाठी काय नाही केलं. त्यांचा किती छळ करण्यात आला, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर आहेत आणि धर्मवीरच राहणार, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ‘त्या’ जमिनीच्या तपासासाठी अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल, एकनाथ खडसेंच्या अडचणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -