पवार आडनावावरून गुलाबराव पाटलांची लग्नमंडपातच शाब्दिक फटकेबाजी

शिवसेनेचे (शिंदे गट) गुलाबराव पाटील हे कधी काय बोलून जातील, याचा काहीही नेम नसतो. ज्यामुळे ते आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा गुलाबराव पाटील हे त्यांच्या बिनधास्तपणे वक्तव्ये करण्याच्या शैलीमुळे चर्चेत आले आहे.

Gulabrao Patil was verbally assaulted in the wedding hall over Pawar surname

शिवसेनेचे (शिंदे गट) गुलाबराव पाटील हे कधी काय बोलून जातील, याचा काहीही नेम नसतो. ज्यामुळे ते आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा गुलाबराव पाटील हे त्यांच्या बिनधास्तपणे वक्तव्ये करण्याच्या शैलीमुळे चर्चेत आले आहे.

गुलाबराव पाटील आणि वक्तव्ये हे समीकरण तसे काही नवे नाही. अनेकदा गुलाबराव पाटील हे त्यांच्या वक्तव्यांमुळे वादामध्ये सुद्धा सापडले आहेत. त्यामुळे ते कधी काय बोलून जातील, याचा काहीही नेम नसतो. पण काही वेळा त्यांची वक्तव्ये ही समोरच्या व्यक्तीला शांत करण्यासाठी देखील प्रभावी ठरत असतात. आता गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा त्यांच्या शाब्दिक फटकेबाजीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी ही शाब्दिक फटकेबाजी एका लग्नमंडपात केल्याने एकच हशा पिकला.

तर झाले असे की, शिवसेनेचे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. या लग्नात वधूचे आडनाव हे पवार होते. ज्यानंतर गुलाबराव पाटील नववर-वधूला शुभेच्छा देताना पवार या आडनावावरून जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणचीही चालत नाही,” लग्नमंडपातच गुलाबराव पाटील यांनी राजकीय फटकेबाजी केल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी सुद्धा पाटील यांच्या या वक्तव्यांची मजा घेतली.

हेही वाचा – मंत्रिपदासाठी पुढे पुढे मात्र सभागृहात गैरहजेरी

याआधी सुद्धा गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कव्वाली सादर केली होती. ज्यामुळे त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले होते. त्या कार्यक्रमामध्ये गुलाबराव पाटील यांनी “चढता सूरज धीरे धीरे” ही संपूर्ण कव्वाली एकही शब्द न चुकवता गेली होती. त्यांच्या या आणखी एका कौशल्याला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांनी सुद्धा दाद दिली होती. दरम्यान, गुलाबराव पाटील यांचा पवार आडनावावरून लग्नात राजकीय फटकेबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.