घरमहाराष्ट्रआजूबाजूच्या कोंबड्यांना बाजूला करा - गुलाबराव पाटील

आजूबाजूच्या कोंबड्यांना बाजूला करा – गुलाबराव पाटील

Subscribe

14 दिवसानंतर शिवसनेचे बंडखोर नते गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे नते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला विधानसभेत उत्तर दिले. आम्हालाही बाहेर पडल्याचं दु:ख सलतंय. आजबाजूच्या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं., असे गुलाबराव पाटील म्हणाले.

14 दिवसानंतर शिवसनेचे बंडखोर नते गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे नते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला विधानसभेत उत्तर दिले. आम्हालाही बाहेर पडल्याचं दु:ख सलते आहे. आजबाजूच्या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केले. जे आमच्या मतांवर निवडून येतात त्यांनी आमची लायकी काढली. आम्हाला डुक्कर म्हटले. ही आमची लायकी. इतकी वर्ष शिवसेनेत काम केले, त्याची ही बक्षिसी? असा सवाल करतानाच आजूबाजूच्या कोंबड्यांना बाजूला करा, मग बघा. शिवसेना कशी वाढतेय, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर गुलाबराव पाटील बोलत होते. आम्ही केवढी मोठी रिस्क घेऊन आम्ही बाहेर निघालो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखा विरोधी पक्ष आहे. भाजप सोबत अडीच वर्ष संघर्ष केला. याची जाणीव आम्हाला आहे. आदित्य ठाकरे किती फिरले पाहा. त्यांचे दौरे काढा. सर्व लिस्टवर आहे. पण एकटे शिंदे साहेब फिरले. शिंदे पाच वेळा आमच्या मतदारसंघात आले. शरद पवार 80 वर्षाचा माणूस जळगावात तीन वेळा आले. टोपे आले, मुंडे आले, अजितदादा आले. जयंत पाटील आले. तुम्ही का नाही आले? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंवर टीका – 

डोळ्याला डोळा भिडवा म्हणता आमचा डोळा मिळाला शिंदे साहेबांशी. आमचा डोळा मिळाल फडणवीस साहेबांशी , आणि लक्षात आले की, जबसे तुम्हारी निगाहें मेहरबान हो गई, मुश्किल बहोत थी, जिंदगी आसान हो गई, बेहद करीब होने का हमे ये फायदा हो गया की, मतलब परस्त लोगों की पहेचान हो गई, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता पलटवार केला.

- Advertisement -

काही लोक म्हणतात आमच्या नजरेला नजर भिडवली नाहीये. अरे वर्ष वर्ष आम्ही जेलमध्ये राहिलो. 302, 307 भोगलेले लोक आहोत आम्ही. सहज आम्ही आमदार झालो नाही. भगवा झेंडा हातात घेऊन जय भवानी, जय शिवाजी… करत इथपर्यंत पोहोचलेले लोकं आहोत. आम्ही तडीपार झालेले लोक आहोत. नजर नजर मे रहना भी कमाल होता है, नफस नफस मे भी करना कमाल होता है, बुलंदीओ पर पोहोचना कमाल नही, बुलंदीओ पर ठहरना कमाल होता है, असा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -