घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपदवीधर निवडणूकीत गुलाल कुणाचा; रात्री ८ वाजेपर्यंत निवडणूक कल येणार समोर

पदवीधर निवडणूकीत गुलाल कुणाचा; रात्री ८ वाजेपर्यंत निवडणूक कल येणार समोर

Subscribe

नाशिकनाशिक : राजकीय घडामोडींमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात कोण गुलाल उधळणार याविषयी आता राजकीय चर्चांना जोर आला आहे. सत्यजित तांबेंची बंडखोरी आणि ऐनवेळी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवत रिंगणात उतरलेल्या शुभांगी पाटील यांच्यासह १६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरुवारी मतमोजणीतून होणार आहे. सय्यद पिंप्री येथील नवीन शासकीय गोदामात मतमोजणीची तयारी पूर्णत्वास गेली आहे. मतमोजणीकरीता ३०० अधिकारी, कर्मचारी तसेच २५० पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवडणूकीची प्रक्रिया बघता रात्री ८ वाजेपर्यंत निवडणुक निकालाच कल समोर येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पदवीधर निवडणुकीसाठी ३० जानेवारी रोजी विभागातील ३३८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा गतवर्षीपेक्षा पाच टक्के मतदान कमी झाले. विभागात ४९.२८ टक्के मतदान झाले. विभागातील २ लाख ६२ हजार ६७८ पैकी १ लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी घसरल्याने त्याचा निकालावर काय परिणाम होईल याचे आडाखे उमेदवारांच्या समर्थकांकडून बांधले जात आहे. काँग्रेसने आ.डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देउनही त्यांनी अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा म्हणजेच सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत वाढली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या शुभांगी पाटील, वंचित बहुजन आघाडीचे रजन बनसोडे, स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार यांच्यासह १६ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. पाटील या धुळयाच्या तर तांबे हे नगर जिल्हयातील आहेत. तांबे यांना भाजपकडून छुप्या पध्दतीने बळ मिळाले तरी आपण अपक्षच आहोत अशी भूमिका मांडली. तर पाटील यांच्या पाठीशी महाविकास आघाडीने ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला. एकाही पक्षाचा अधिकृत उमेदवार या निवडणुकीत नसल्याने अपक्ष उमेदवारांच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तांबे यांच्या खेळीतून काय साध्य झाले हे आजच्या निकालातून समोर येणार आहे.

- Advertisement -
तीनशे अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती

सैय्यद पिंप्री येथील गोदामात होणारया मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी ३०० अधिकारी, कर्मचारी तसेच २५० पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने नाशिक विभागातील पाचही जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व इतर महत्वाच्या अधिकार्‍यांवर विविध जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या. सर्व प्रक्रिया नियोजनबध्दरीत्या पार पाडण्यासाठी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचार्‍यांनी सर्वांनी जबाबदारी ओळखून कामे करावीत, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यापूर्वीच दिले आहेत.

अशी होणार मतमोजणी

सैय्यद पिंप्री येथील गोदामात मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात होईल. प्रथम सर्व ३३८ मतदान केंद्रांवरील मतपत्रिकांचे ५०-५० चे गठठे करण्यात येतील. या गठठयांचे एत्रिकरण झाल्यानंतर प्रत्येक टेबलावर एक हजार याप्रमाणे एकूण २८ टेबरलाव पहिल्या पसंतीच्या मतमोजणीस सुरूवात होईल. पाच फेर्‍यात ही मतमोजणी घेण्यात येणार आहे.

- Advertisement -
मतमोजणीचे प्रशिक्षण

बुधवारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणी पूर्व तपासणी, अनुषंगीक माहिती नमूद करण्यासाठीची विवरणपत्रे, टपाली मतपत्रिकांची मोजणी, मतपत्रिका वैध व अवैध ठरविणे, अवैध मतपत्रिकांची वर्गवारी, टेबलवरील मतपत्रिकांची मोजणी आदींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

..तर मतमोजणी लांबणार

निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान झाले आहे. मतमोजणीच्या प्राथमिक फेरीत एखाद्या उमेदवाराने कोटा गाठल्यानंतर निकाल लागू शकेल. पण कुणाला कोटा गाठता न आल्यास मोजणीच्या पुढील फेर्‍या कराव्या लागतील. त्यामुळे मतमोजणी लांबू शकते, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले. साधारणपणे रात्री ८ वाजेपर्यंत निवडणूक निकालाचा अंदाज लक्षात येईल मात्र कोटा गाठता न आल्यास रात्री १२ नंरतरही निकाल लागू शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -