घरमहाराष्ट्रहोय मी एसटी कर्मचार्‍यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतले

होय मी एसटी कर्मचार्‍यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेतले

Subscribe

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची न्यायालयात कबुली

आंदोलक एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेत त्यातून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होत असतानाच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात पोलिसांना पैसे मोजण्याचे मशीन सापडल्याने मोठी खळबळ माजली होती. त्यातच बुधवारी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत:हूनच न्यायालयात एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतल्याचे कबूल केले आहे. ही रक्कम 1 कोटी 44 लाख रुपये असल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केला आहे.

बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचार्‍यांकडून प्रत्येकी 200 ते 300 रुपये घेतल्याची कबुली दिली आहे, मात्र हे पैसे एसटी कर्मचार्‍यांनी आपल्या मर्जीने दिल्याचा दावाही सदावर्ते यांच्याकडून करण्यात आला आहे. सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: न्यायालयात बाजू मांडली. एसटी कर्मचार्‍यांकडून गोळ्या केलेल्या पैशांतून सदावर्तेंनी मुंबईत मालमत्ता खरेदी केली. सदावर्तेंकडे पैसे मोजण्याचे मशीन आहे, असा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला होता. त्याला स्वत: सदावर्ते यांनी उत्तर दिले. सदावर्ते म्हणाले की, एसटी विलिनीकरण्याच्या याचिकेसाठी मी एसटी कर्मचार्‍यांकडून केवळ 200 ते 300 रुपये घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी कोर्टाला सांगावे. तसेच, सर्व 48 हजार एसटी कर्मचार्‍यांच्यावतीने मी न्यायालयात बाजू मांडत होतो. पण एकानेही माझ्याविरोधात तक्रार केली नाही, असा युक्तीवाद सदावर्ते यांनी केला.

- Advertisement -

याआधी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचार्‍यांकडून गोळा केलेल्या पैशांतून 60 लाखांची मालमत्ता घेतल्याचा आरोप केला होता. याच पैशातून परळ आणि भायखळा येथे मालमत्ता घेतल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. सोबतच या पैशांतून सदावर्तेंनी काही चारचाकी घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यातील एक गाडी केरळमधून 23 लाखांना खरेदी केल्याचे अ‍ॅड. घरत यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे.

ताबा कोल्हापूर पोलिसांकडे
सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता अ‍ॅड. सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात त्यांना कोल्हापूर पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -