सदाभाऊ तुम्ही पाया पडलेले व्हिडिओ माझ्याकडे, गुणरत्न सदावर्ते यांचे वक्तव्य

Gunaratna Sadavarte warn Sadabhau khot and gopichand padalkar
सदाभाऊ तुम्ही पाया पडलेले व्हिडिओ माझ्याकडे, गुणरत्न सदावर्ते यांचे वक्तव्य

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण आणि पगारवाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे. यानंतर राज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत करुन आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी तात्पुरते आंदोलनातून माघर घेतली आणि आझाद मैदान सोडून घरी परतले. पंरतु यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर येऊन पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना इशारा दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. यानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांचे नेतृत्व केलं आहे. कर्मचाऱ्यांकडून करोडो गोळा केले असल्याचा आरोप करण्यात येत असल्याचे सदावर्ते यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सदावर्ते यांनी म्हटलं आहे की, कोणाकडूनही मी एक रुपया घेतला नाही आहे. मी संघटना नाही. सदाभाऊ खोत तुम्ही माझ्या पाया पडलेले व्हिडिओ माझ्याकडे आहे. ते जर मी रेकॉर्डींग सांगितली तुम्ही दोन लेकरांची शपथ घेतो असे म्हणालात. परंतु सदाभाऊ खोत आणि पडळकर तुम्ही दोन वेळा माझ्या घरी आला होता. विश्वास नांगरे पाटील यांची भीती वाटत होती. म्हणून तुम्ही आला होता असे वक्तव्य सदावर्ते यांनी केलं आहे.

दरम्यान सदावर्ते यांनी पुढे म्हटलं आहे की, माझ्याकडे तुमचा पाया पडत असलेला व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग आहे. सदाभाऊ खोत तुम्ही वयोवृद्ध आहात म्हणून बोलत नाही. पण १० किमीवरील ओबीसींसाठी शाळा सांगू का लोकांना, शाळेवर हे प्रकरण सदाभाऊंना घेऊन गेलं हे मी डंके की चोटवर सांगतो असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे. हे शरद पवार यांचे तोडो पॉलिटीक्स आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत गेले नाही तर त्यांना आता आम्हीच आझाद मैदानातून आझाद केलय असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे. मी नॉन पॉलिटीकल माणूस आहे. त्यामुळे बड्या नेत्याविरुद्ध बोलू शकतो असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय