घरमहाराष्ट्रजेलवारीनंतर सदावर्तेची सपत्नीक अयोध्यावारी

जेलवारीनंतर सदावर्तेची सपत्नीक अयोध्यावारी

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील अयोध्येला जाणार आहेत. याबाबत त्यानी घोषणा केली आहे. यावेळी त्यानी आम्हा दाम्पत्याला अयोध्येत बोलवणे आले आहे. आणि आम्ही दोघे ही डंके की चोटपे अयोध्येत जाणार आहोत, असे सांगितले.

आम्ही दोघे अयोध्या प्रकरणी न्यायालयीन प्रकरणात वकील म्हणून कार्यरत होते. आम्हा दाम्पत्याला अयोध्येत बोलवणे आले आहे. त्याप्रमाणे आम्ही दोघे डंके की चोटपे अयोध्येत जाणार आहोत, अशी घोषणा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

- Advertisement -

एसटी कर्मचारी जाणार आयोध्येला –

आमच्या कष्टकरी जनसंघाचे अयोध्येत साधू संत स्वागत करणार आहेत, हे समजल्यावर काहींच्या जमिनीखालची जमीन घसरली आहे. यामुळे माझ्या विरोधात नोटीस पाठवली आहे. म्हणून डंके की चोट पर आम्ही नोटीसला कायदेशीर उत्तर देणार आहोत, असे वकील सदावर्ते म्हणाले. आमच्याबरोबर एसटीचे कर्मचारी ही अयोध्येत येणार आहेत, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

- Advertisement -

नोटीसला देणार उत्तर –

ज्या दिवशी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता, तेव्हा सदावर्ते मॅटच्या न्यायालयात युक्तीवाद करत होते. अशी माहिती न्यायालयाला दिली आहे. या नोटीसवर न्यायालयात उत्तर देण्यासाठी आम्हाला अवधी देण्यात आला आहे, असे सदावर्ते यांचे वकील म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -