घरफोटोगॅलरीMaratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार - गुणरत्न सदावर्ते

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार – गुणरत्न सदावर्ते

Subscribe

Maratha Reservation : मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यासंदर्भात शिंदे समितीकडून अध्यादेश काढण्यात आला. यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिला आहे. सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार, अशी भूमिका सदावर्ते यांनी स्पष्ट केली.

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना वकिल गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, खुल्या वर्गातील, ब्राम्हण, वैश्य, जैन , मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील त्यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबुत ठेवणं, त्यावर गदा येऊन ने देणं, त्याचप्रमाणए खऱ्या मागासवर्गीय जाती आहेत. त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणं, याची जबाबदारी आमच्यावर आहे.

- Advertisement -

सदावर्ते यांनी सगेसोयरे यावर भाष्य करताना म्हणाले की, सगेसोयरे यांबाबत जे बोललं गेलं, ते आधीपासून कायद्यात अंतर्भूत आहेत. त्यामुळे कुणाही या गोष्टीला विजयोत्सव वगौर म्हणू नये, जरांगे पाटील यांच्याकडून ही दिशाभूल केली जाणारी बाब असू शकते. वेगवेगळे स्टंट केले जातात, त्यापैकी हा एक राजकीय स्टंट आहे. संजय राऊत, रोहित पवार, निखील वागळे यांनी उभे केलेलं हे स्टंट आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेवर हे टिकणारं नाही. कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही, डंके की चोट पर.. हे मी सांगतो असं सदावर्ते म्हणाले.

कोणतीही बॅक डोअर एन्ट्री हा प्रकार कायद्याच्या संहितेत नाही, अशी तरतुद कायद्यात नाही. कुणबींना मागास कुणबी नाही, हे स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे. आजच्या प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात, मात्र कायद्यानुसार आरक्षण टिकू शकत नाही.

- Advertisement -

रोहित पवार आझाद मैदानात गेले होते. संजय राऊत, निखील वागळे यांनी आपली जागा पाहावी. अशा लोकांनी माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. माझ्या मराठा बांधवांनी आपली एनर्जी वाया घालू नये. कायदा वाचावं, कलमं पाहावी. वाचाल तर वाचाल. जरांगेंनी कोणता अभ्यास केलाय माहिती नाही. जरांगेंकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

माझे मराठे बांधव आता ईडब्यूएसपासून वंचित राहतील. त्यांना EWS पासून दूर ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. सरकारचा अध्यादेश एक नोटीस आहे. मागास आयोगामध्ये काय सुरु आहे. अधिकाऱ्यांचे संरक्षण कसं केलं जात आहे. याबाबत लवकरच कोर्टाचे दार ठोठावणार आहोत, असं सदावर्ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -