घरमहाराष्ट्रगुरू पवारांचा इतिहासही खंजिराचाच…, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर पलटवार

गुरू पवारांचा इतिहासही खंजिराचाच…, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर पलटवार

Subscribe

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या, गुरुवारी स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपा तसेच ठाकरे गटात पुन्हा एकदा कलगितुरा रंगला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ज्यांना गुरू मानतात, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा इतिहास खंजिराचाच आहे, अशी टीका भाजपाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, हातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेबांना अभिवादन करा, असा टोला लगावला होता. त्यावर पुणे येथे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेवर पलटवार केला.

- Advertisement -

संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजीराचाच आहे. पण, शिंदे गटाच्या खंजिराला किमान एक पार्श्वभूमी तरी आहे. हिंदुत्वाचा विसर उद्धव ठाकरेंना पडल्यामुळे अस्वस्थ होऊन एकनथ शिंदे आणि इतर शिवसेना आमदारांनी बंड केले, असे सांगून, पण त्यांचा हा आपापसातला विषय आहे, अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी जोडली.

सरकार अस्थिर होत आहे, ते कधीही कोसळणार आणि मध्यावधी निवडणूक लागणार, असे विरोधक म्हणतच असतात. ते त्यांचे कामच आहे. त्यामुळे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षातच राहतात. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

गिरीश महाजनांनी दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला
बाळासाहेब ठाकरे देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि स्मारकाला हात जोडायला जा. कोणीही असतील त्यांनी आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि बाळासाहेबांना नमस्कार करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी जा. कोणाचे व्यक्तिगत नाव घेत नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊत यांच्या या विधानाचा भाजपा नेते गिरीश महाजन यांनीही समाचार घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लावून तुम्ही निवडून आला होतात. त्यानंतर तुम्ही आमच्याशी असलेली युती तोडली. बाळासाहेबांच्या विचारांनाही तिलांजली दिली. मग खंजीर कोणी खुपसला? याचे आत्मपरिक्षण संजय राऊतांनी करावे, असा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -