Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र Guru Purnima 2021: यंदाही शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवात शुकशुकाट

Guru Purnima 2021: यंदाही शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवात शुकशुकाट

दरवर्षी साईनामाचा जयघोष, रस्त्यावरील रेलचेल, संपुर्ण शिर्डीत मंदीरात होणार अखंड जाप या सर्वांनी शिर्डी फुलून जाते.

Related Story

- Advertisement -

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत या वर्षीसुद्धा गुरूपौर्णिमेचा दिवशी भाविक साईनाथांचे दर्शन घेऊ शकणार नाही. कोरोना व्हायरसचे संकट अद्याप देशावरून टळले नसून यंदाही गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यास भक्तांची गर्दी होणार नाहीये. दरवर्षी साईनामाचा जयघोष, रस्त्यावरील रेलचेल, संपुर्ण शिर्डीत मंदीरात होणार अखंड जाप या सर्वांनी शिर्डी फुलून जाते. देशातील दुसऱ्या क्रमांकाच श्रीमंत देवस्थान म्हणून साईबाबांच्या शिर्डीची ओळख आहे. दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत गुरूपौर्णिमेच्या दिवशी बाबांचे दर्शन घेण्यासाठी दुर- दुरच्या राज्यातून शिर्डीत दाखल होतात.मत्र यंदा भाविकांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. ब्रेक द चेन या मोहीमे अंतर्गत सरकारने लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही नियमावली जाहीर केली होती यामध्ये धार्मिक स्थळे बंद करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता. परिस्थिती काहीश्या प्रमाणात ओटोक्यात आल्या नंतर मागील वर्षी 16 नोव्हेंबरला मंदिर सुरू झाले होते. आणि यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा संसंर्ग वाढल्याने सरकारने पुन्हा लॉकडॉऊन घोषित केल्याने 5 एप्रिल पासून मंदिराचे दरवाचे पुन्हा बंद करण्यात आले होते. शिर्डीतील स्थानिक नागरिकांचा मुख्य व्यवसाय तसेच शिर्डीतील अर्थकारण संपुर्ण शिर्डीच्या साईबाबा मंदिरावर अवलंबून असून मंदिर बंद झाल्याने कोट्यवधींची उलाढाला असलेल्या शिर्डीच्या लोकांवार याचा मोठ्या परिणाम झाला आहे. तसेच यंदाही गुरूपौर्णिमेच्या दिवशी भाविकांना शिर्डीत प्रवेश देण्यात मनाई करण्यात आली आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – कोकणाला केंद्र सरकारकडून मदत, बचावकार्यासाठी टीम पाठवणार असल्याची नारायण राणे यांची माहिती

- Advertisement -