Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमNashik Crime News : गुटखा सप्लायरला अटक; कार अन् घरात लपवलेला साठा...

Nashik Crime News : गुटखा सप्लायरला अटक; कार अन् घरात लपवलेला साठा जप्त

Subscribe

नाशिक शहरातील पानटपरीचालकांना मिक्स गुटख्याचा सप्लाय करणार्‍या संशयित आरोपीस अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. पथकाने त्याच्याकडून अडीच लाखांच्या गुटख्यासह वॅगनआर कार असा साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इम्तियाज जाफर तांबोळी (वय ३८, रा. मज्जिते हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक) असे संशयित गुटखा सप्लायरचे नाव आहे. (Gutkha supplier arrested; Seized the car and hidden stock in the house)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेने गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी अंमली पदार्थविरोधी पथकास गांजा, एमडी ड्रग्ज, गुटखा व तत्सम पदार्थांच्या तस्करी, विक्रीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील एनडीपीएस युनिटच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे व पथक कारवाई करत होते. त्यावेळी सुशीला कोल्हे यांना गुटखा सप्लायर तांबोळी याची माहिती मिळाली. त्यानुसार एनडीपीएस पथकानेशनिवारी (दि. १६) अशोका मार्गावरील त्याच्या घराच्या पार्किंगमधील कारसह त्याच्या घरात छापा टाकला.

- Advertisement -

पथकास गुटख्याची काही पाकिटे कारमध्ये आढळली आणि घरात गुटख्याचा साठा लपविल्याचे आढळून आले.
पथकाने जप्त मुद्देमालासह तांबोळीचा ताबा मुंबई नाका पोलिसांकडे सोपविला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -