ज्ञानवापी मशीदप्रकरणी सुनावणी पूर्ण, न्यायालय उद्या निकाल देणार

Gyanvapi Masjid case hearing completed
Gyanvapi Masjid case hearing completed

ज्ञानवापी मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा कोर्टात सुनावणी आज पूर्ण झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने निकाल सुरक्षित ठेवला आहे. हा निकाल उद्या दुपारी दोन पर्यंत येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी जिल्हा कोर्टासमोर घेण्यात आली.

ज्ञानवापी मशीद प्रकरणातील पुढील सुनावणीची प्रक्रिया काय असावी याबाबत कोर्ट उद्या निकाल सुनावणार आहे. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत, अशी मागणी केली होती. तर मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती.

वाराणसी जिल्हा कोर्टात आज खटल्याशी संबंधितांना प्रवेश देण्यात आला. हिंदू पक्षाच्यावतीने ज्येष्ठ अधिवक्ता मदन बहादूर सिंह आणि अॅड. हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन उपस्थित होते. तर, मुस्लिम पक्षाच्यावतीने रईस अहमद आणि सी. अभय यादव उपस्थित होते. वाराणसी जिल्हा न्यायलयाने या वादाच्या सुनावणीची प्रक्रिया काय असावी याबाबत कोर्ट निकाल सुनावणी करणार आहे. पुढील सुनावणी सीपीसीच्या नियम 11 पर्यंत सुनावणी घ्यावी की कमिशन अहवाल आणि सीपीसीनुसार सुनावणी घ्यावी यावर निकाल सुनावणार आहे.