घरCORONA UPDATEMaharashtra Unlock: राज्यात इनडोअर जिम, व्यायामशाळा बंदच

Maharashtra Unlock: राज्यात इनडोअर जिम, व्यायामशाळा बंदच

Subscribe

राज्यात सुरू होणाऱ्या मिशन बिगीन अगेनच्या पुढील टप्प्यात इनडोअर जिम, व्यायामशाळा बंदच राहणार आहेत. केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून ५ ऑगस्टपासून सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. या संबंधीचे पत्रक राज्य शासनाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आले आहे. केंद्र सरकारने काल सायंकाळी अनलॉक ३ सोबतच कटेंनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवल्याचे जाहीर केले. त्यानंतर ठाकरे सरकारनेही लॉकडाऊनमध्ये वाढ केली. राज्य सरकारच्यावतीने यासंबंधीची नियमावली जाहीर करण्यात आली असून मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचे काही नियमदेखील यामध्ये शिथील करण्यात आले. नव्या नियमावलीनुसार बाईकवर दोन जणांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने स्थानिक महानगरपालिकेच्या नियमानुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच दारूच्या दुकानांना होम डिलिव्हरीचा पर्याय खुला राहील. मॉल्स आणि मार्केट कॉम्पलेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत खुले ठेवण्यात येतील. मात्र त्यात थिएटर, फूड कोर्ट, रेस्टॉरंट सुरु करता येणार नाहीत. रेस्टॉरंटचे किचन होम डिलिव्हरीसाठी सुरू करता येऊ शकते. आऊटडोअर खेळ जसे की गोल्फ, टेनिस, फायरिंग, बॅडमिंटन, मल्लखांब अशा खेळांना सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून सुरू करण्यात आले आहे. मात्र स्विमिंग पूलसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. शिवाय टॅक्सी, चारचाकी गाडी, कॅबमध्ये चालकासहीत तीन प्रवासी, रिक्षामध्ये चालकासहीत दोन प्रवासी आणि मोटारसायकलवर दोन प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

यंदा चौपाटीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी करावं लागणार Booking!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -