Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र H3N2 चे रुग्ण वाढले, कोरोनासारखीच लक्षणे आणि उपाय; मास्कसक्ती आणि क्वारंटाइन गरजेचं?

H3N2 चे रुग्ण वाढले, कोरोनासारखीच लक्षणे आणि उपाय; मास्कसक्ती आणि क्वारंटाइन गरजेचं?

Subscribe

H3N2 Virus | या आजाराची लक्षणेही कोरोनासारखीच असल्याने हा आजारही वेगाने पसरतोय. त्यातच, आता शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

H3N2 Virus | मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जगभरातून आनंद व्यक्त झाला. परंतु, आता आणखी एक विषाणू डोकं वर काढतोय. देशातसध्या एच३एन२ एन्फ्लुएन्झाचा संसर्ग वाढला असून याची बाधा लहान मुलं, प्रौध व्यक्तींना होतोय. या आजाराची लक्षणेही कोरोनासारखीच असल्याने हा आजारही वेगाने पसरतोय. त्यातच, आता शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

एच३एन२ हा विषाणू नवीन नाही. १९६५ मध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. इतर विषाणूप्रमाणेच या विषाणूनेही आपल्या संरचनेत अनेक बदल केले. हिवाळ्यात या विषाणूचा अधिक प्रसार होतो. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह अनेक शहरांत खोकल्याने अनेकजण ग्रासले होते. आजही खोकल्यामुळे अनेकजण हैराण आहेत. याबाबत एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी एच१ एन१ विषाणूचा आजार पसरला होता. आता याच विषाणूचा प्रसारित स्ट्रेन म्हणजे एच३ एन२ आहे. विषाणू म्युटेट झाल्याने आता या विषाणूचे रुग्ण आढत आहेत.

- Advertisement -

लक्षणं काय आहेत?

या विषाणूची लक्षणेही कोरोनाप्रमाणेच आहेत. सर्दी, खोकला आणि सामान्य ताप सुरुवातीला जाणवतो. लहान मुलांना कोरडा खोकला होतो. तर, प्रौढांनाही याप्रकरची समस्या जाणवू शकते. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जात आहे.

- Advertisement -

काय काळजी घ्याल?

  • कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपण मास्कचा वापर करत होतो. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्कसक्ती गरजेची आहे.
  • बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळा.
  • हात, चेहरा स्वच्छ ठेवा.
  • सॅनिटायजर जवळ बाळगा.
  • धुळयुक्त कोणत्याही वस्तूंवर हात लावू नये.
  • सर्दी झाली असेल तर स्वतःला क्वारंटाइन करून घ्यावं.

खोकल्याचे रुग्ण वाढले

गेल्या काही दिवसांपासून राज्यात खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. तसंच, यामुळे स्वरयंत्राला इजा होऊन आवाजही निघत नसल्याच्या तक्रारी अनेक रुग्णांनी केल्या आहेत. हा खोकला संसर्गजन्य असल्याने प्रत्येक घरात खोकल्याचे रुग्ण आहेत. एकाला खोकला झाला की काही दिवसांनी घरातील इतर सदस्यांनाही खोकला होतो.

- Advertisment -