घरCORONA UPDATEकोरोना संशोधनावर आयआयटीमध्ये होणार हॅकेथॉन

कोरोना संशोधनावर आयआयटीमध्ये होणार हॅकेथॉन

Subscribe

कोरोनाशी लढा देण्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये कोविड-१९ हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये कोविड-१९ हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात या आजाराशी लढण्यासाठी विविध संशोधन सादर करण्याचे आवाहन आयआयटीच्यावतीने करण्यात आले आहे.
चीनच्या वुहानमधून सुरू झालेला कोरोनाचा कहर संपूर्ण जगात पसरला आहे. जगातील १५७ देशांत याचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत जगात हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

 

- Advertisement -

आपल्या देशातही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार आणि इतर संस्थांकडून तसेच वैद्यकीय विभागाकडून जोरात प्रयत्न चालू आहेत. जगाला वेठीस धरणाऱ्या आजाराशी लढा देण्यासाठी विविध संशोधन आणि माहिती सादर करण्याचे आवाहन आयआयटी मुंबईने केले आहे. यातील विजेत्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी २ एप्रिलपर्यंत www.hackathon.e-yantra.org वर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

देशात किंवा राज्यात कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी आयआयटीचे विद्यार्थी नेहमीच पुढाकार घेतात. ग्रामीण भागातल्या प्रश्नांना हात घालत ते कसे सोडवण्यासाठी यात प्रामुख्याने विद्यार्थी प्रयत्न करताना दिसतात यापूर्वी आयआयटी मुंबईच्या ‘हॅकेथॉन’मध्ये असे अनेक कल्पक प्रोजेक्ट सादर करण्यात येवून ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी ते पूरकही ठरले आहेत. त्यामुळे कोरोनाचे संशोधन पुढे येण्यासाठी आयआयटी मुंबईचा प्रयत्न सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -