Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 10 वर्षाच्या मुलीच्या पोटातून काढला 100 ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा

10 वर्षाच्या मुलीच्या पोटातून काढला 100 ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा

Subscribe

मुंबई : एका 10 वर्षांच्या मुलीच्या पोटातून 100 ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा यशस्वीपणे काढण्यात बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे डॉक्टर यशस्वी ठरले. या मुलीने ट्रायकोफेगियास, ट्रायकोटिलोमॅनिया (स्वतःचे केस ओढणे) आणि ते ओढलेले केस खाल्याने हा गोळा पोटात तयार झाला यामुळे तिला पोटात तीव्र वेदना होत होत्या. सुमारे 2 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर आता रुग्णाची प्रकृती स्थिरावली आणि ती या वेदनांपासून मुक्त झाली आहे.

दादर येथील कियारा बन्सल हिला वयाच्या 9 व्या वर्षी मासिक पाळी आली म्हणून ती मासिक पाळीची औषधे घेत होती. रुग्णाला खूप रक्तस्त्राव होत होता आणि त्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त काळ पोटदुखी होत होती, पण त्याचा त्रास होत नव्हता. तिला उलट्या होणे, हालचाल करताना वेदना जाणवणे, वजन कमी होणे यासारखी इतर कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे आढळून आली नव्हती. तिचे कुटुंब घाबरले आणि अल्ट्रासाऊंड तपासणी करुन विविध डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि या वेदना मेसेंटरिक लिम्फॅडेनाइटिसशी संबंधित आहे ज्यामुळे ओटीपोटाच्या लिम्फ नोड्सला सूज आली आहे. तिला डॉक्टरांनी औषधे लिहून दिली. ही स्थिती सामान्यतः तिच्या वयोगटातील रुग्णांमध्ये दिसून येते ज्यामुळे ओटीपोटात वेदना होतात. वेदनेचे व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णावर लक्षणात्मक उपचार केले जातात. रुग्णाला तिच्या पोटाला स्पर्श करताना गाठ असल्यासारखे जाणवले आणि तिने हे तिच्या आईला सांगितले. तिची आई घाबरली आणि तिने तिला पुढील उपचारासाठी मुलीला वाडिया रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे बाल शल्यचिकित्सक डॉ पराग करकेरा सांगतात की क्लिनिकल तपासणीत, आम्हाला पोटात गाठ असल्याचे जाणवली. ओटीपोटात दुखत असलेले रुग्णनियमितपणे येतात परंतु तेथे गाठ जाणवत नाही. आम्ही एक सीटी स्कॅन केले ज्यामध्ये ट्रायकोबेझोअर दिसले जो पोटातील केसांचा गोळा होता आणि त्याचा काही भाग ड्युओडेनममध्ये (लहान आतड्याचा पहिला भाग) दिसून आला. केस विरघळण्यास सक्षम नसतात, म्हणून ते पचनसंस्थेत राहते आणि नंतर ते बॉलच्या आकारातील गोळा किंवा वस्तुमानात रूपांतरीत होऊन ते सतत वाढत जाते. मुलांमध्ये हे क्वचितच दिसून येते. या रुग्णाला ट्रायकोटिलोमॅनिया (अशी स्थिती ज्यामध्ये स्वतःचेच केस काढण्याची तीव्र इच्छा निर्माण होते). तिला ट्रायकोपागियाचा त्रासही होता, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःचे केस खाते. तिच्या आई-वडिलांनाही तिचे केस खाण्याबाबत माहिती नव्हती. तपासणीनंतर, तिला गॅस्ट्रोटॉमी आणि केसांचा गोळा काढून टाकण्यासाठी लॅपरोटॉमीचा सल्ला देण्यात आला.

डॉ करकेरा पुढे सांगतात की, गॅस्ट्रोटॉमी म्हणजे बेझोअर काढून टाकण्यासाठी पोटात एक छिद्र तयार करावे लागते. या प्रकरणात ट्रायकोबेझोअर हे गिळलेल्या केसांपासून बनलेले वस्तुमान होते. ही प्रक्रिया सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर 100 ग्रॅम वजनाचा हेअरबॉल काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतरच्या सातव्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले. तिच्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास आतड्यांसंबंधी समस्या किंवा आतड्यांना छिद्र येणे म्हणजेच पोटाच्या भिंतीला छिद्र आणि लहान आतड्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

- Advertisement -

डॉ मिन्नी बोधनवाला, कार्यकारी प्रमुख, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनच्या सांगतात की, रुग्णांवरीस उपचाराकरिता चांगल्या दर्जाची अत्याधुनिक उपकरणे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. वाडिया हॉस्पिटल हे गंभीर किंवा जीवघेणे आजार असलेल्या मुलांवर यशस्वी उपचार करणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. त्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, वाडिया हॉस्पिटल त्वरीत आणि अचूक निदान करु शकते. उत्कृष्ट वैद्यकीय सुविधांव्यतिरिक्त, वाडिया हॉस्पिटल आपल्या सर्व रूग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा पुरवितो.

 


 हेही वाचा :

भजन गायक दीपक पुजारीला विनयभंगप्रकरणी अटक, GRP पोलिसांची कारवाई

- Advertisment -