Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'एचएएल'ला मिळाले सहा हजार कोटींचे काम; एचटीटी ४० जातीची ७० विमाने बनवणार

‘एचएएल’ला मिळाले सहा हजार कोटींचे काम; एचटीटी ४० जातीची ७० विमाने बनवणार

Subscribe

नाशिक : ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीला विमाने बनविण्यापोटी अधिकचे काम मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असतेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.देशालगतच्या सीमा सुरक्षित असाव्यात यापोटी वायूदलात भरती होणार्‍या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी ४० जातीचे विशेष ट्रेनर विमाने तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.एचटीटी ४० जातीचे सत्तर विमाने तयार करण्याचे ६ हजार ८०० कोटी रूपयांचे काम ओझर येथील एचएएल कंपनीला मिळाले आहे.

विविध जातीचे विमाने तयार करण्याची एचएएल ही केंद्र शासनाची मोठी कंपनी असून ओझर एचएएल मध्ये आजपर्यंत अनेक जातींच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे ३ हजार अधिकारी,कर्मचारी कार्यरत आहेत.विविध जातींची यशस्वी विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा मोठा हातखंड आहे.परंतु गेल्या काही वर्षापासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी आहे. यातूनच विमाने तयार करण्याचे वाढीव काम एचएएल कंपनीला मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून खा.गोडसे प्रयत्नशील होते.काही महिन्यांपूर्वी खा. गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक,सेक्रेटरी संजय कुटे,गिरीश पाटील, प्रशांत आहेर,नितीन पाटील आदींनी दिल्ली येथे जात संरक्षण विभागाचे सेक्रेटरी अजय कुमार यांची भेट घेतली होती.ओझर एचएएलला विमान निर्मितीची ऑर्डर देण्याचे साकडे यावेळी खा.गोडसे यांनी अजयकुमार यांना घातले होते. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुरावामुळे वायूदलात भरती होणार्‍या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याचे क्षमता असलेले एचटीटी ४० जातीचे ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एचएएलला देण्याचे निर्णय सरंक्षण विभागाने घेतला असून पैकी दहा विमानांची निर्मिती बंगलोर येथील एचएएलमध्ये तर उर्वरित साठ विमानांची निर्मिती ओझर एलएएलमध्ये करण्यात येणार आहे.

वायूदलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना एचटीटी ४० जातीचे ट्रेनर विमानाव्दारे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या विमानाचे ताशी स्पीड चारशे किलोमीटर असणार असून विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकणार आहे. सदर विमान पुर्णतः भारतीय बनावटीचे असणार आहे. एचटीटी ४० जातीचे विमाने तयार करण्याच्या कामाला येत्या काही दिवसात प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. :  हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -