घरCORONA UPDATELockdown : देशातील अर्धी लोकसंख्या खासगी दवाखाने व रुग्णालयावर अवलंबून!

Lockdown : देशातील अर्धी लोकसंख्या खासगी दवाखाने व रुग्णालयावर अवलंबून!

Subscribe

देशामधील काही ठिकाणी खासगी दवाखाने आणि रुग्णालये बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी खासगी दवाखाने आणि रुग्णालये काही तासाकरिता उघडले जातात.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सेवांना सूट देण्यात आली आहे. परंतु देशामधील काही ठिकाणी खासगी दवाखाने आणि रुग्णालये बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी खासगी दवाखाने आणि रुग्णालये काही तासाकरिता उघडले जातात. काही शस्त्रक्रिया ही रद्द करण्यात आल्या आहेत. खासगी डॉक्टर हे रुग्णांना भेटण्याऐवजी फोन किंवा व्हाट्सएपद्वारे संपर्क करून औषध सांगितली जातात.

अर्धी लोकसंख्या खासगी रुग्णालय व दवाखान्यावर अवलंबून

देशातील अर्धी लोकसंख्या ही खासगी रुग्णालयात औषधोपचार घेण्यासाठी धावतात. २०१५-१६ च्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, शहरी ५६ टक्के आणि ग्रामीण ४९ टक्के लोकसंख्या आजारी पडल्यावर सर्वात पहिले खासगी रुग्णालय आणि दवाखान्यामध्ये जातात.

- Advertisement -

महापालिकेने २० क्लिनिकला दिली नोटीस

महाराष्ट्रात कर्फ्यु लागल्यावर २ ते ३ दिवसांनंतर क्लिनिक आणि प्रायव्हेट नर्सिंग होम बंद ठेवण्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यानंतर महापालिकेने महानगरामधील २० क्लिनिकला एपिडेमिक डिसीज अँक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथील सर्व क्लिनिक सुरू करण्यात आले. आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडे म्हणतात की, प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांना पीपीई मिळत नाही. त्यामुळे खासगी डॉक्टर क्लिनिक उघडण्यास घाबरत आहेत.

* देशातील ५१ टक्के लोकसंख्या खासगी दवाखाने व रुग्णालयात उपचार घेतात.

शहरी लोकसंख्या  ग्रामीण लोकसंख्या एकूण

- Advertisement -

खासगी हेल्थ सेक्टर – ५६.१० % – ४९.०० % – ५१.४० %

खासगी रुग्णालय – २५.३० % – १५.१० % – १८.६० %

खासगी डॉक्टर/क्लिनिक – २८.६० % – २९.५० % – २९.२० %

खासगी पैरामेडिक – ०.५० % – १.२० % – १.०० %

वैद्य/हकीम/होमिओपॅथी – ०.२० % – ०.३० % – ०.३० %

फार्मसी – ०.७० % – १.०० % – ०.९० %

इतर सेक्टर – ०.९० % – १.८० % – १.४० %

(स्रोत – नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, २०१५-१६ )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -