घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"अर्धसत्य सांगण्यात आल, पक्षातील काहींनी आमच्या कुटुंबाला अडचणीत आणल"; तांबेंचा रोख कोणाकडे?

“अर्धसत्य सांगण्यात आल, पक्षातील काहींनी आमच्या कुटुंबाला अडचणीत आणल”; तांबेंचा रोख कोणाकडे?

Subscribe

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक सुरवातीपासूंच रंजक घडामोडींनी चर्चेत राहिली. सोमवारी (दी.३०) रोजी यासाठी मतदान पार पडले. अनेक उमेदवारांनी सकाळच्या सत्रातच आपले स्वताचे मतदान केले. मात्र, सत्यजित तांबे यांनी नगर जिल्ह्यातील सर्व मोर्चेबांधणी करून झाल्या नंतर दुपारी संगमनेर येथील आपल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तुम्हाला ‘अर्धसत्य सांगण्यात आलय, योग्य वेळी सगळं सांगेल” असे म्हंटल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सत्यजित तांबे यांचे मतदान पार पडल्यानंतर पत्रकारांनी त्यांना तुम्ही अपक्ष म्हणून पुढे काम करणार की कुठल्या पक्षात जाणार अशी विचारणा केली असता. ‘मी सध्या तरी अपक्ष म्हणूनच कार्यरत राहणार, मात्र, मी इंडियन नॅशनल कोंग्रेस असे नमूद करूनच अर्थात कोङ्ग्रेस्स पक्षाचा उमेदवार म्हणूनच उमेदवारी दाखल केली होती, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपे पर्यंत मी एबी फॉर्म जमा न करू शकल्याने अखेर माझी उमेदवारी अपक्ष ग्राह्य धरण्यात आली. असे म्हणतानाच जे सांगताय की दोन एबी फॉर्म देण्यात आले होते. ते अर्धसत्य असून योग्य वेळ आल्यावर सगळं समोर मांडेल’ असे म्हंटले आहे. सत्यजित यांच्या या विधांनामुळे त्यांचा रोख थेट कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडे आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

खरतर, कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनीच तांबे पिता पुत्रांना दोन एबी फॉर्म दिले होते. एक डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने तर  दूसरा कोरा फॉर्म पाठवला होता असे वक्तव्य केले होते. त्यामुळे डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच सत्यजित यांचे मामा बाळासाहेब थोरात हे देखील अडचणीत सापडले होते. मात्र, सत्यजित यांनी बोलताना सांगितले की, तब्बल १०० वर्षाहून अधिक काळापासून अधिक काळापासून कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ट राहिलेल्या आमच्या कुटुंबाला पक्षातील काही लोकांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आत्ता तरी जास्त काही बोलणार नाही, परंतु वेळ आल्यावर सगळ्याचा खुलासा करेल असे म्हंटले आहे. नेमक सत्यजित यांच्या निशाण्यावर कॉंग्रेस मधील कोण कोण नेते आहेत. कोणी त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला. याबबात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -