घरताज्या घडामोडीसाधू हत्या प्रकरण : पालघर घटनेचा तपास 'एनआयए'कडे सोपवा - हायकोर्टात याचिका

साधू हत्या प्रकरण : पालघर घटनेचा तपास ‘एनआयए’कडे सोपवा – हायकोर्टात याचिका

Subscribe

साधू हत्या प्रकरणी पालघर येथील एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पालघरमध्ये जमावाकडून झालेल्या हत्येप्रकरणी तपासावर आक्षेप घेत या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात यावा, अशी मागणी एका याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. दरम्यान, पालघर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा किंवा विशेष तपास पथक नेमून करावा, अशी विनंती करणारी याचिका आधीच सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. याशिवाय साधू हत्या प्रकरणी पालघर येथील एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या वाहनाच्या चालकाची हत्या करण्यात आली. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी शंभरहुन अधिक आरोपींना लगोलग अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. परंतु यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. असेच आता याप्रकरणी तपासावरून न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयातील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी बुधवारी या प्रकरणी एक जनहित याचिका दाखल करत तपास सीआयडीकडून काढून घेऊन तो सीबीआयकडे सोपविण्यात यावा, किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी व्हावी, अशी विनंती केली आहे. पालघरमधील गडचिंचले गावात जमावाने दोन साधूंवर काठ्या आणि लोखंडी सळयांनी हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी जमावाला रोखण्याचा जराही प्रयत्न केला नाही. उलट एका साधूला पोलीस अधिकाऱ्याने जमावाच्या बाजूने ढकलले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -