भारतात याआधीही चौघांना झाली होती फाशी, पुणे कनेक्शनचे देशातले एकमेव प्रकरण

pune serial killing
पुण्यात झालेल्या साखळी खूनाच्या सत्रानंतर ४ दोषींना फाशी देण्यात आली होती

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत इतिहासात फक्त एकदाच अशी वेळ आली आहे की जेव्हा चार दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात आली होती. ही घटना पुण्यातली आहे आणि १९८३ सालची. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनावर शहा या चार दोषींनी २३ ऑक्टोबर १९८३ साली एकाचवेळी फाशी देण्यात आली होती. कारण होते ते म्हणजे १९७६ मध्ये घडलेले जोशी – अभ्यंकर हत्याकांड. पुण्यासारख्या शांत आणि सुरक्षित शहराच्या प्रतिमेला पहिल्यांदाच मोठा धक्का धक्का बसला होता. अनेक दिवस या हत्याकांडाचा सस्पेन्स कायम होता. बराच काळ उलटूनही या प्रकरणाचा गुंता सुटत नव्हा. महिलांचे – मुलांचे आणि निष्पाप नागरिकांचा जीव घेणारा हत्याकांड म्हणून पुणेकरांच्या स्मरणात हा हत्याकांड अनेक दिवस आठवणीत आहे. तब्बल ३६ वर्षांनंतरही पुण्यातल्या स्मरणात हे हत्याकांड आहे. या प्रकरणाला अनुसरूनच नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला माफीचा साक्षीदार आणि २००३ मध्ये अनुराग कश्यपचा माफीचा साक्षीदार हा चित्रपट आला होता.

nana patekar
जोशी अभ्यंकर हत्याकांडानंतर नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असलेला चित्रपट

आपल्या आयुष्यात आपल्याला कायम डावलले गेले या भावनेने अगदी खूनापर्यंतची आणि नंतर सिरियल किलिंगसारखे गुन्हे या चौघांकडून घडले. कॉलेज जीवनात बंडखोरीसोबतच दारू आणि इतर व्यसनांना कमी पडणारा पैसा यासाठी कमी पडणाऱ्या पैशामुळे त्यांनी दरोड्याचा मार्ग स्विकारला. पण त्यानंतर पुण्यात झालेल्या जोशी अभ्यंकर हत्याकांडामुळे या सर्वांनी केले गुन्हे हे अक्षम्य आहेत असे मत या प्रकरणातील न्यायाधीशांनी मांडले. अवघ्या दीड वर्षात या चौघांनी मिळून १० खून केले. तसेच दरोड्याचेही सत्र सुरू ठेवले. म्हणून न्यायाधीशांनी त्यांना हे प्रकरण अत्यंत rarest of the rarest अशी नोंद करत फाशीची शिक्षा केली.