Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Raj Thackeray Video : भोंगे उतरवण्याचा बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट करत राज...

Raj Thackeray Video : भोंगे उतरवण्याचा बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाणा

Subscribe

दरम्यान मनसैनिकांच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई शहरात विविध ठिकाणी भेट देत आढावा घेतला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून भोंग्याचा विरोधात तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पहाटे अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आले आहे. भोंग्याविरोधात आक्रमक मनसैनिकांवर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. तर हजारो मनसैनिकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. दरम्यान मनसैनिकांनी एकीकडे भोंग्याचा मुद्दा उचलून धरला असतानाच राज ठाकरे यांनी याच मुद्द्यावरील दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्येही बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत आपली आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे.

या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांकडून महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर आल्यानंतर रस्त्यावरील नमाज पठण बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली आहे. बाळासाहेबांची हिच भूमिका आज राज ठाकरेंकडून कायम ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून आज राज्यात ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण करत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्वीट अकाऊंटवरून ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांचा कुठेतरी विसर पडल्याचे सुचवण्यात आले आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी हनुमान चालीस पठन करण्याबाबत आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध केले होते. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणार की शरद पवारांचे ऐकणार असा सवाल उपस्थित केला होता. यानंतर आज राज ठाकरेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत शिवसेनाला जुन्या विचारधारांची आठवण करुन दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान मनसैनिकांच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई शहरात विविध ठिकाणी भेट देत आढावा घेतला आहे. काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसीरकडे डीसीपींकडून आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थान परिसराची पाहणी करण्यात आली असून घराबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Raj Thackeray Loudspeakers Row : भोंग्याविरोधात मनसे आक्रमक; राज्यभरात कडक बंदोबस्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -