Homeताज्या घडामोडीHappy New Year 2025 : देवाच्या आशीर्वादानं नव्या वर्षाची सुरूवात; भाविकांची तीर्थक्षेत्रांवर...

Happy New Year 2025 : देवाच्या आशीर्वादानं नव्या वर्षाची सुरूवात; भाविकांची तीर्थक्षेत्रांवर तुफान गर्दी

Subscribe

2024 या सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर आजपासून 2025 या नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. सध्या सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुतन वर्षाच जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिकांनी राज्यभरातील विविध पर्यटन स्थळं गाठली आहेत.

मुंबई : 2024 या सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर आजपासून 2025 या नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. सध्या सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुतन वर्षाच जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिकांनी राज्यभरातील विविध पर्यटन स्थळं गाठली आहेत. तर काहींनी नुतनवर्षानिमित्त तीर्थक्षेत्रांवर गर्दी केली आहे. त्यानुसार राज्यातील पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, शिर्डी साईबाबा संस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक मंदीर, गणपतीपुळे मंदीर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. (happy new year celebration 2025 maharashtra many devotees crowd at siddhivinayak pandharpur temple shirdi saibaba temple tuljapur tuljabhavani temple)

नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी. दरवर्षी जसा 31st जल्लोषात साजरा केला जातो, त्याचप्रमाणे वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिक मंदिरात जातात. नवीन वर्षाची सुरुवात आनंदमयी व मंगलमय व्हावी यासाठी देवाचा आशीर्वाद घेतात. त्यानुसार, यंदाही भाविकांची प्रचंड गर्दी तीर्थक्षेत्रांवर पाहायला मिळत आहे. नववर्षानिमित्त राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, भरभराटीचे आणि निरोगी असावे, अशी प्रार्थना सर्व भाविकांकडून केली जात आहे.

सध्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी, यासाठी भाविकांची मंदिरात गर्दी आहेत. पहिली आरती अनुभवण्यासाठी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराप्रमाणेच पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी असंख्य भाविक रांगेत उभं राहून दर्शन घेत आहेत. सध्या हा परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजला आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.

कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मंदिराचा परिसरही भाविकांच्या गर्दीने गजबजला आहे. अंबाबाईच्या चरणी नवीन वर्षाचा संकल्प करण्यासाठी स्थानिकांसह देशभरातून भाविक मंदिरात दाखल झाले आहेत.

नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनाने करण्यासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची शिर्डीत अलोट गर्दी जमली आहे. सध्या या ठिकाणी साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक होताना दिसत आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

अक्कलकोटनगरीत स्वामी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. नवीन वर्षानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशासह राज्यातील विविध भागातील भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत.


हेही वाचा – Eknath Shinde : प्रगतिशील महाराष्ट्रासाठी…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नववर्षानिमित्त शुभेच्छा