‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी ‘ई’ विभागात एकाचवेळी ७ ठिकाणांहून निघाली प्रभातफेरी

mumbai municipal corporation election 2022 in December or January?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱया घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या ई विभाग कार्यालयाच्या वतीने आज (दिनांक १२ ऑगस्ट २०२२) एकाचवेळी सात ठिकाणाहून प्रभातफेरी काढण्यात आली. सिनेअभिनेत्री श्रीमती डायना पेंटी यांच्या उपस्थितीत ही प्रभातफेरी निघाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम देखील ई विभाग कार्यालयाने हाती घेतले आहेत.

बृहन्मुंबई महानरपालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालय येथून प्रभातफेरीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्थानिक पोलिस प्रशासन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निरनिराळ्या शाळांचे विद्यार्थी आणि महानगरपालिका कर्मचारी इत्यादी सहभागी झाले. या प्रभातफेरीसाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रीमती डायना पेंटी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ‘ई’ विभाग परिसरात एकाचवेळी सात वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रभातफेरी निघाली.

प्रभातफेरीच्या माध्यमातून उपआयुक्त (परिमंडळ – १) श्रीमती चंदा जाधव यांनी सर्व स्थानिक रहिवाश्यांना दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबविण्यासाठी आवाहन केले. तसेच ई विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांनी सावित्रीबाई फुले शाळा, पूर्व भायखळा मराठी शाळा, वाडीबंदर शाळा, शेठ मोतिशा शाळा, आग्रीपाडा शाळा येथून उपस्थित सुमारे ५०० विद्यार्थ्यांना संबोधित करुन त्यांना अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच, उपस्थित सर्व महानगरपालिका कर्मचारी, सुमारे ३०० पोलिस कर्मचारी आणि मान्यवर यांना ‘ई’ विभाग कार्यालयाद्वारे दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविल्या जाणाऱया विविध उपक्रमांची माहिती दिली.

यानंतर, ‘स्वातंत्र्य लढ्यातील भायखळ्याचे योगदान’ ह्या संकल्पनेवर ई विभाग कार्यालयामार्फत तयार केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील श्रीमती डायना पेंटी यांच्या हस्ते करण्यात आले. ई-विभागामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारती, महापौर निवास, महाराणा प्रताप चौक, खडा पारसी पुतळा, नागपाडा चौक इत्यादी ठिकाणी विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. तसेच विभागातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये देखील सजावट करण्यात येत आहे. तसेच कामाठीपुरा परिसरात नाईलाजाने देहविक्रय करुन उपजीविका भागविणाऱया महिलांसाठी ‘मेरा घर – स्वच्छ सुंदर घर’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा : सर्व गरीब एकत्र आले अन् देशात गरिबांचा पंतप्रधान झाला, रावसाहेब दानवेंनी उधळली